पाकने ८८९ कमांडो केले तैनात; मात्र कोरोनाने केला घात

तरीही पाकिस्तान-वेस्ट इंडीज मालिकेला आजपासून सुरुवात
WI VS PAK T20 : विंडीजच्या तीन खेळाडूंना कोरोना
WI VS PAK T20 : विंडीजच्या तीन खेळाडूंना कोरोनाsakal
Updated on

कराची : पाकिस्तानमध्ये (Pakistan Cricket Team) आगमन झाल्यावर करण्यात आलेल्या आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांमध्ये पाहुण्या विंडीज संघातील तीन खेळाडू व एका कर्मचाऱ्याला कोरोना (Corona) असल्याचे निष्पन्न झाले. ‘‘आमच्या ताफ्यातील तीन खेळाडू व एका साहायक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना लगेचच अलगीकरणात पाठवण्यात आले आहे,’’ असे क्रिकेट वेस्ट इंडीजने ( Cricket West Indies) (सीडब्ल्यूआय) याबद्दल पुष्टी करताना म्हटले आहे. (WI vs PAK T20 Three West Indies players Corona Positive)

डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल, अष्टपैलू रोस्टन चेस आणि काइल मेयर्स यांच्यासह संघ व्यवस्थापन युनिटमधील एका सदस्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ते अनुपलब्ध असतील. कोरोनाची लागण झालेल्या सर्व सदस्‍यांचे पूर्ण लसीकरण झालेले असून त्यांच्यात कोणतीही मोठी लक्षणे नाहीत.

WI VS PAK T20 : विंडीजच्या तीन खेळाडूंना कोरोना
vijay hazare trophy : महाराष्ट्राचे आव्हान कायम

‘‘आमच्या संघातील चार सदस्‍यांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का असला तरी इतर सर्व सदस्यांचे अहवाल मात्र नकारात्मक आले असल्याने आम्ही नियोजनाप्रमाणे हा दौरा पूर्ण करू याबद्दल खात्री वाटते आहे. सर्व खेळाडू पूर्वीपासून जैवसुरक्षा वातावरणात राहत असले तरीही खेळाडूंना कोरोना संसर्गाचा धोका असतो. तीन खेळाडू अनुपलब्ध असल्याने त्याचा आमच्या संघावर नक्कीच परिणाम होणार आहे, परंतु उर्वरित संघातील खेळाडू चांगले उत्साहात आहेत व त्यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी सराव चालू केला आहे,’’ असे क्रिकेट वेस्ट इंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.