WI VS PAK T20 : वेस्टइंडीज संघाच्या सुरक्षेसाठी PCB ने 889 कमांडो केले तैनात

हा दौरा पाकिस्तानी क्रिकेटसाठी वेस्ट इंडिजपेक्षा जास्त महत्त्वाचा
WI VS PAK T20 : वेस्टइंडीज संघाच्या सुरक्षेसाठी PCB ने 889 कमांडो केले तैनात
WI VS PAK T20 : वेस्टइंडीज संघाच्या सुरक्षेसाठी PCB ने 889 कमांडो केले तैनातsakal
Updated on

WI VS PAK T20 : वेस्ट इंडिजचा संघ तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. हा दौरा पाकिस्तानी क्रिकेटसाठी वेस्ट इंडिजपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही काळापासून अडचणींचा सामना करत आहे. वेस्ट इंडिज संघासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर बराच काळ पाकिस्तानमध्ये एकही सामना झालेला नाही. हळूहळू संघ पाकिस्तानचे दौरे करू लागले. यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्याने PCB पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आता वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याने बोर्डासह चाहत्यांनाही नवी आशा दिली आहे. वेस्ट इंडिजचा संघ गुरुवारी कराचीला पोहोचला जिथे त्यांची कोरोना चाचणी झाली. आता खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना हॉटेल क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. दोन्ही देशांमधला पहिला T20 सामना 13 डिसेंबर रोजी कराची येथील नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

WI VS PAK T20 : वेस्टइंडीज संघाच्या सुरक्षेसाठी PCB ने 889 कमांडो केले तैनात
ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजाने निवडले टॉप 5 कसोटी फलंदाज

कराची पोलिसांनी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज कराची येथील नॅशनल स्टेडियमवर सुरू होणाऱ्या तीन t-20 आणि तीन एकदिवसीय मालिकेसाठी सुरक्षा योजना तयार केली आहे. द न्यूजच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत नेहमीच भीती असते. गुरुवारी सिंध बॉईज स्काउट्स सभागृहात महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा आराखडा तयार करण्यात आला. बैठकीत डीआयजी सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा विभाग मकसूद अहमद यांनी भेटीसाठी कडक सुरक्षा उपायांची माहिती दिली.

WI VS PAK T20 : वेस्टइंडीज संघाच्या सुरक्षेसाठी PCB ने 889 कमांडो केले तैनात
विराटचा फोन स्विच ऑफ; कोचकडून BCCI च्या कारभारावर ताशेरे

889 कमांडो तैनात करण्यात येणार आहेत

कराची पोलिसांचे 13 वरिष्ठ अधिकारी, 315 एनजीओ, 3,822 कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल, 50 महिला पोलिस कर्मचारी, रॅपिड रिस्पॉन्स फोर्सचे 500 कर्मचारी आणि 889 कमांडो यांच्यासह एकूण 46 डीएसपी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतील. कराची वाहतूक पोलिसही सर्व ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष शाखेचे अधिकारी नॅशनल स्टेडियम आणि हॉटेल्समध्ये तैनात केले जातील. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष टीम सज्ज असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.