T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Rishabh Pant Sanju Samson
T20 WC 2024 India Squad Wicket Keeper Selection esakal
Updated on

T20 WC 2024 India Squad Wicket Keeper Selection : आयपीएल 2024 पूर्वी भारतीय टी 20 संघाचा जितेश शर्मा हा प्रमुख विकेटकिपर होता. आता आपयपीएलचा अर्ध्यापेक्षा जास्त हंगाम झाल्यानंतर जितेश शर्मा टी20 वर्ल्डकपच्या भारतीय संघात जागा मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडला आहे.

आता ऋषभ पंत, संजू सॅमसन यांनी आपली दावेदारी ठोकली आहे. केएल राहुल देखील निवडसमितीला आपला विचार करण्यास भाग पाडत आहे. अशा परिस्थितीत निवडसमितीला कोणत्या विकेटकिपरला संघात स्थान द्यायचं याचं टेन्शन नक्कीच आलं असणार.

Rishabh Pant Sanju Samson
IPL 2024, GT vs RCB: विल जॅक्सचं झंझावाती शतक अन् विराटची तोलामोलाची साथ; बेंगळुरूने गुजरातला 9 विकेट्सने दिली मात

संजू सॅमसन

राजस्थान रॉल्सचा कर्णधार संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएल हंगामात तुफान फलंदाजी केली आहे. त्याचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. संजूने 9 सामन्यात 77 च्या सरासरी आणि 161 च्या स्ट्राईक रेटने 385 धावा केल्या आहेत. त्याने 36 चौकार आणि 17 षटकार मारले आहेत.

ऋषभ पंत

अपघातानंतर 15 महिन्यांनी मैदानावर उतरलेल्या ऋषभ पंतने आयपीएल 2024 च्या हंगामात धाडेकाबाज पुनरागमन केलं. सुरूवातीला अडखळती फलंदाजी करणाऱ्या पंतने नंतर लय पकडली. त्याने 10 सामन्यात 46 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत.

त्याने देखील 161 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यात त्याने 23 षटकार मारले आहेत. वेस्ट इंडीजच्या खेळपट्टीवर टायमिंगपेक्षा ताकदीवर फटकेबाजी करणारे खेळाडू जास्त चालतील. पंत अशाच धाटणीचा फलंदाज आहे.

Rishabh Pant Sanju Samson
T20 World Cup 2024 : चहल-सॅमसनला मिळाली टी 20 वर्ल्डकप संघात संधी; मात्र भारताच्या माजी सलामीवीरानं 'या' स्टार खेळाडूला दाखवला कट्टा

केएल राहुल

केएल राहुलने 2022 च्या टी20 वर्ल्डकपनंतर भारतासाठी या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. यानंतरही तो दावेदार मानला जात आहे. मात्र, राहुलची अडचण अशी आहे की तो T20 मध्ये टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. सध्या भारतीय टी20 संघाला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एका कीपरची गरज आहे.

आयपीएलच्या या मोसमातही राहुलने फलंदाजी करताना धावा केल्या आहेत. 9 सामन्यात त्याने 144 च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या आहेत. राहुलसोबत स्ट्राईक रेटचीही समस्या आहे. त्याने केवळ 14 षटकार मारले आहेत.

जितेशही आक्रमक फलंदाजी करू शकतो

आयपीएलमुळे भारतीय संघाची मागील कामगिरी विसरता येणार नाही. पंजाब किंग्जमध्ये जितेश शर्माला एका स्थानावर सातत्याने खेळण्याची संधी मिळत नाही. भारतासाठी T20 मध्ये त्याने 147 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याचे नाव टी20 वर्ल्डकप संघात आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Rishabh Pant Sanju Samson
Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

हेही आहेत रेसमध्ये

दिनेश कार्तिक आणि इशान किशन हे दोन पर्याय आहेत ज्यांना हलके घेता येणार नाही. इशानने टी-20 मध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, रणजी न खेळल्यामुळे त्याला बीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते. दिनेश कार्तिकही आयपीएल 2024 मध्ये फिनिशर म्हणून अप्रतिम कामगिरी करत आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.