Zimbabwe Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट हादरलं! प्रशिक्षक असलेल्या पती - पत्नीचा महिन्याभरात गूढ मृत्यू

Zimbabwe Cricket Sinikiwe Mpofu Death
Zimbabwe Cricket Sinikiwe Mpofu Death esakal
Updated on

Zimbabwe Cricket Sinikiwe Mpofu Death : झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाची 37 वर्षीय सहाय्यक प्रशिक्षक सिनिकिवे एमपोफू यांचा अचानक मृत्यू झाला. त्यापूर्वी 15 डिसेंबरला त्यांचे पती शेफर्ड माकुनुरा यांच देखील निधन झालं होते. ते झिम्बाब्वे क्रिकेट वरिष्ठ पुरूष संघाचे फिल्डिंग कोच होते. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली.

Zimbabwe Cricket Sinikiwe Mpofu Death
Rahul Dravid On Suryalumar Yadav : सूर्यानं लहानपणी नक्कीच माझी बॅटिंग बघितली नाही... द्रविडने सूर्याची खेचली

या पोस्टमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट असोसिएशनने या घटनेबाबत माहिती दिली. एमपोफू या झिम्बाब्वेच्या माजी महिला क्रिकेटपटू देखील आहे. त्या आपल्या घरात शनिवारी सकाळी अचानक कोसळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर आता त्यांच्या मृत्यू कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी पोस्ट मार्टम करण्यात येणार आहे. एमपोफू या आपले पती माकुनूरा यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजून सावरल्याही नव्हत्या तोपर्यंत त्यांनाही मृत्यूने गाठले. या प्रशिक्षक पती पत्नी जोडीला दोन मुले देखील आहेत. (Sports Latest News)

Zimbabwe Cricket Sinikiwe Mpofu Death
IND vs SL: जळका पांड्या! सूर्याच्या फटकेबाजीवर झाला नाराज...

एमपोफू यांचा जन्म बुलावेयो येथे 21 फेब्रुवारी 1985 मध्ये झाला होता. त्या एक गुणवान अष्टपैलू खेळाडू होत्या. झिम्बाब्वेच्या महिला संघाने 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्या या ऐतिहासिक संघाच्या सदस्य होत्या. त्यांनी शाळेपासूनच क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.