IND vs AUS 2nd T2OI : भारत - ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात पाऊस खेळ बघडवू शकतो?

 India Vs Australia 2nd T20I In Nagpur What Is Weather Report
India Vs Australia 2nd T20I In Nagpur What Is Weather Report esakal
Updated on

India Vs Australia 2nd T20I Rain And Weather : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज ( दि. 23) सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे दोन्ही संघाची सराव सत्रे देखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या टी 20 सामन्यावर पावसाचे ढग गडद झाले आहेत. दुसऱ्या टी 20 सामन्यात पाऊस खेळ बिघडवणार तर नाही ना अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

 India Vs Australia 2nd T20I In Nagpur What Is Weather Report
Jasprit Bumrah : बुमराह परतणार; भुवी, पटेल की यादव कोणाचा पत्ता कट होणार?

जरी गेल्या काही दिवसांपासून नागपुरात होत असलेल्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी अॅक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी नागपूरचे तापमान सरासरी 29 डिग्री सेल्सियस असणार आहे. तर 64 भाग हा ढगांनी आच्छादलेला असणार आहे.

दुसऱ्या सामन्याची नाणेफेक 6.30 ला होणार आहे तर सामना बरोबर अर्ध्या तासांनी सुरू होईल. जर सामना ज्यावेळी होणार आहे त्या वेळेच्या हवामान अंदाजाबाबत बोलायचे झाले तर या दरम्यान तापमान 26 डिग्री सेल्सियस इतके असले. सामना जसजसा पुढे सरकेल तसे तापमान हे साधारणपणे 25 डिग्री सेल्सियसच्या असापास राहण्याची शक्यता आहे.

 India Vs Australia 2nd T20I In Nagpur What Is Weather Report
Shahid Afridi : आफ्रिदीने खेळपट्टीवर खड्डा पाडल्याची दिली कबुली; म्हणाला ही माझी मोठी चूक!

भारताने मोहालीतील सामना गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1 - 0 ने पिछाडीवर पडला आहे. भारताने मोहालीत चांगली गोलंदाजी केली नाही. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 52 धावा दिल्या तर हर्षल पटेलने 4 षटकात 49 धावांची लयलूट केली. उमेश यादवने 2 षटकात 27 धावात देत 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 2 षटकात 22 धावा दिल्या.

भारताला 208 धावा डिफेंड करता आल्या नाहीत. कॅमेरून ग्रीनने 61 तर मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्यापूर्वी भारतातडून हार्दिक पांड्याने 71 तर केएल राहुलने 55 धावा करत भारताला 20 षटकात 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.