Wimbledon : जोकोविचनं साजरं केलं क्वार्टर फायनलचं अर्धशतक!

या विजयासह ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने 50 वेळा क्वार्टर फायनलमध्ये पोहचण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला.
Novak Djokovic
Novak DjokovicTwitter
Updated on

विम्बल्डनचा गत चॅम्पियन नोवाक जोकोविचने सोमवारी झालेल्या सामन्यात सरळ सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला गारद करत क्वार्टर फायनल गाठली. नंबर वन नोवाक जोकोविचने 17 व्या मानांकित क्रिस्टियन गारिन याला प्रवेश केला. 6-2, 6-4, 6-2 असे पराभूत केले. या विजयासह ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्याने 50 वेळा क्वार्टर फायनलमध्ये पोहचण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला. (Novak Djokovic Reaches 50th Grand Slam Quarter Final)

विम्बल्डन स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम आठमध्ये जागा पक्की करण्याचा विक्रम हा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावे आहे. त्याने 18 वेळा विम्बल्डनची क्वार्टर फायनल गाठलीये. जिम्मी कोनर्स (14) याच्यानंतर आर्थर गोरे आणि नोवाक जोकोविच संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी 12 वेळा विम्बल्डनची क्वार्टर फायनल गाठली आहे.

Novak Djokovic
सचिननं दिला क्रिकेटच्या पंढरीतील आठवणींना उजाळा

यंदाच्या स्पर्धेत पुरुष गटातून तीन खेळाडूंनी पहिल्यांदाच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानावर असलेला रूसचा कारेन खाचनोव याने अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डावर 3-6, 6-4, 6-3, 5-7, 10-8 असे पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री केली. त्याचा सामना आता डेनिस शापोवालोव याच्याशी रंगणार आहे. या दोघांशिवाय मॅटिओ बेरेटिनी यानेही पहिल्यांदाच अंतिम आठमध्ये जागा पक्की केली आहे.

Novak Djokovic
स्मृतीनं एका ओळीत सांगितली आयुष्याच्या प्रवासाची कहाणी

महिला गटात नंबर वन अ‍ॅश्ली बार्टीने फ्रेंच ओपनची चॅम्पियन बारबोरा क्रेजसिकोवा हिला 7-5, 6-3 असे पराभूत केले. या विजयासह बार्टीने पहिल्यांदाच अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला.. ट्युनिशियाची ओंस जाबेर ही विम्बल्डनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचणारी पहिली अरब महिला खेळाडू ठरलीये. तिने 2020 फ्रेच ओपन चॅम्पियन इगा स्वियातेक हिचा संघर्षमय लढतीत 5-7, 6-1, 6-1 असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.