Wimbledon 2024 मध्ये पुन्हा अल्का'राज'? मेदवेदेवला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा गाठली फायनल

Carlos Alcaraz: स्पेनच्या २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन स्पर्धेची फायनल गाठली आहे.
Carlos Alcaraz
Carlos AlcarazSakal
Updated on

Carlos Alcaraz in Wimbledon Final: स्पेनचा २१ वर्षीय युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. शुक्रवारी (१२ जुलै) पाचव्या मानांकीत डॅनिल मेदवेदेवला त्याने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्यावर्षी अल्काराजने विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घालत मोठा पराक्रम गाजवला होता.

शुक्रवारी सेंटर कोर्टवर २ तास ५५ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात अल्काराजने मेदवेदेवला 6-7(1), 6-3, 6-4, 6-4 अशा चार सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.

गेल्या २५ वर्षात बिग फोर व्यतिरिक्त म्हणजेच रॉजर फेडरर, राफेल नदाल, अँडी मरे आणि नोवाक जोकोविच व्यतिरिक्त एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धाच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहचणारा अल्काराज पहिलाच पुरुष खेळाडू आहे.

Carlos Alcaraz
Wimbledon 2024: 'Gooood Night', प्रेक्षकांच्या हुर्योला जोकोविचचं प्रत्युत्तर; रुनविरुद्ध विजयासह उपांत्यपूर्व फेरीतही धडक

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्यावर्षीही विम्बल्डनच्या उपांत्य सामन्यात अल्काराजने मेदवेदेवलाच पराभूत करत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात दिग्गज नोवाक जोकोविचला पराभूत केलं होतं.

दरम्यान, आता पुन्हा अंतिम फेरीत त्याचा सामना जोकोविचविरुद्ध होऊ शकतो. जोकोविचने जर शुक्रवारी उपांत्य सामन्यात लॉरेन्झो मुसेटीला पराभूत केले, तर २०२३ विम्बल्डनप्रमाणेच यंदाही अल्काराज विरुद्ध जोकोविच असा अंतिम सामना रंगू शकतो.

याशिवाय अल्काराजने ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याची ही एकूण चौथी वेळ आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने खेळलेल्या तिन्ही ग्रँडस्लॅमचे अंतिम सामने जिंकले आहेत. त्याने अमेरिका ओपन २०२२, विम्बल्डन २०२३ आणि फ्रेंच ओपन २०२४ असे तीन ग्रँडस्लॅम आत्तापर्यंत जिंकले आहेत.

तसेच जर आता त्याने यंदाही विम्बल्डन स्पर्धा जिंकली, तर एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकणारा तो रॉड लेव्हर, ब्योर्न बॉर्ग, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यानंतरचा सहावा खेळा़डू ठरेल.

Carlos Alcaraz
Wimbledon 2024: पाओलिनीने जिंकली ऐतिहासिक सेमीफायनल; क्रेसिकोवाकडून रायबाकिनाला पराभवाचा धक्का

सोमवारी मेदवेदेवविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर तिसरा मानांकीत अल्काराज म्हणाला, 'आज मी जी कामगिरी केली, त्यामुळे खूप खूश आहे. माझी सुरुवात निराशाजनक होती. मेदवेदेव सामन्यात वर्चस्व गाजवत होता. त्याच्या सर्व्ह आणि रिटर्नसह तो चांगला खेळ करत होता.'

'माझ्यासाठी जरा कठीण जात होते, पण मी दुसऱ्या सेटपासून जीव ओतला. मी घेतलेल्या ३-१ च्या आघाडीची मदत झाली. त्यानंतर मी माझा नैसर्गिक खेळ करू शकलो आणि सामन्याचा आनंद अधिक घेऊ शकलो. मी चांगले शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खरं सांगायचं तर मी चांगला सामना खेळला.'

मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये अल्काराजला टायब्रेकरमध्ये पराभूत केले होते. पण त्यानंतर अल्काराजने पुनरागमन करत सलग तीन सेट जिंकून सामना खिशात घातला.

Pratima olkha:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.