Wimbledon Final 2023 Novak Djokovic : स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्काराझ याने रविवारी पाच सेटच्या थरारानंतर सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविचवर १-६, ७-६, ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवला आणि पहिल्यांदाच विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस जेतेपदाला गवसणी घातली. यामुळे जोकोविच याचे मार्गरेट कोर्ट या महिला टेनिसपटूच्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची (पुरुष व महिला मिळून) बरोबरी करण्याचे स्वप्न भंग पावले. नोवाक जोकोविचने रागाच्या भरात असे कृत्य केले, जे पाहून सगळेच थक्क झाले.
जोकोविचने रागाच्या भरात मोडले रॅकेट
स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने पाचवा सेट गमावल्यानंतर रागाने त्याचे रॅकेट नेटवर मारले, ज्यामुळे त्याचे रॅकेट मोडले. त्याचे रॅकेट फोडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ फक्त २० वर्षांचा आहे आणि तो विम्बल्डन जिंकणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ यांच्यामधील अंतिम फेरीतील पहिला सेट सर्बियाच्या टेनिसपटूने अगदी आरामात जिंकला. जोकोविच याने हा सेट ६-१ असा जिंकून दमदार सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंमध्ये रोमहर्षक झुंज पाहायला मिळाली. या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकमध्ये या सेटचा निकाल लागला. अल्काराझ याने हा सेट ७-६ असा जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.
दुसरा सेट जिंकल्यानंतर अल्काराझचा आत्मविश्वास उंचावला. त्याने या सेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला. स्पेनच्या या खेळाडूने हा सेट ६-१ असा जिंकून २-१ अशी आघाडी मिळवली. जोकोविच चौथ्या सेटमध्ये दबावाखाली असेल अशी चिन्ह निर्माण झाली. पण प्रदीर्घ अनुभव असलेल्या या पठ्ठ्याने झोकात पुनरागमन केले. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या सेटमध्ये अल्काराझ याने जबरदस्त कामगिरी करीत ६-४ असा विजय मिळवत जोकोविचला अजिंक्यपदापासून दूर नेले.
नोवाक जोकोविचने यंदाच्या विम्बल्डनमध्ये दमदार कामगिरी करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विक्रमांपासून तो फक्त एक पाऊल दूर होता. या स्पर्धेत विजेतेपद पटकावले असते तर त्याला मार्गरेट कोर्ट यांच्या सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी करता आली असती. तसेच रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचीही त्याला बरोबरी करता आली असती. एवढेच नव्हे तर या वर्षी त्याला सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घालता आली असती. पण अल्काराझकडून त्याला निराशेला सामोरे जावे लागले.
कार्लोस अल्काराझच्या रूपात टेनिसविश्वासाला नवा तारा लाभला आहे. त्याने मागील वर्षी अमेरिकन ओपन हे ग्रँडस्लॅम जिंकले होते. आणि आता विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याने आपली सत्ता गाजवली आहे. हे त्याचे दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरले हे विशेष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.