विस्डेनने भारत-पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वकालिन प्लेइंग इलेव्हनची निवड केलीये. वनडे इतिहासातील दिग्गजांपासून ते सध्याच्या घडीला मैदानात आपली छाप सोडणाऱ्या खेळाडूंमधून हा संघ निवडण्यात आलाय. टीम इंडिया ही फलंदाजांची खाण मानली जाते. अगदी तसेच पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या बाबतीत म्हटले तर क्रिकेट जाणकारांना याच नवल वाटणार नाही. (WISDEN Selects-All Time India Pakistan Odi XI)
हा संघ निवडताना विस्डेनने ऑल टाईम रँकिंगचा आधार घेतलाय. काही क्रिकेट प्रेमींना हा संघ परफेक्ट वाटू शकतो. तर काहींना यात एखाद्या खेळाडूची उणीवही जाणवू शकते. जाणून घेऊयात या खास प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमक कोणत्या-कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
या संघात भारतातील सहा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इमरान खान यांच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल पाजींचाही संघात समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला याला पसंती देण्यात आली असून डावाची सुरुवात करण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जहिर अब्बास या जोडीची निवड वेस्डनने केलीये. प्रमुख जलदगती गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराहलाही स्थान मिळाले आहे. फिरकीपटूमध्ये मनिंदर सिंह आणि सईद अजमल यांचा संघात सहभाग केल्याचे दिसते.
अशी आहे विस्डेनची सर्वकालिन भारत-पाक प्लेइंग इलेव्हन
1. सचिन तेंडुलकर 2. जहीर अब्बास 3. विराट कोहली 4. जावेद मियांदाद 5. एमएस धोनी 6. कपिल देव 7. इमरान खान (कर्णधार) 8. वासीम अकरम 9. मनिंदर सिंह 10. सईद अजमल 11. जसप्रीत बुमराह.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.