Sports: किम कॉटनने इतिहास रचला! पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत पंच म्हणून कामगिरी करणारी पहिलीच महिला

महिला क्रिकेट पंच किम कॉटनने रचला इतिहास
Sport
Sportsakal
Updated on

ड्युनेडिन - न्यूझीलंडची ४५ वर्षीय महिला क्रिकेट पंच किम कॉटन हिने बुधवारी इतिहास रचला. न्यूझीलंड - श्रीलंका या पुरुषांच्या विभागातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात किम कॉटन मैदानात पंच म्हणून कार्यरत होती.

आयसीसीच्या पूर्ण सदस्य असलेल्या देशांमधील टी़-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मैदानात पंच म्हणून कामगिरी करणारी करणारी किम ही पहिलीच महिला ठरली आहे.

Sport
Pune Crime: माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी

किम कॉटन हिने याआधी महिला क्रिकेटमधील ५४ टी-२० सामन्यांत, तर २४ एकदिवसीय सामन्यांत मैदानातील पंच आणि टीव्ही पंच म्हणून काम पाहिले आहे.

महिलांचा टी-२० विश्‍वकरंडक या वर्षी पार पडला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही किम कॉटन हिने पंच म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती

Sport
Mumbai Crime : मुंबई विमानतळ बनलंय सोने तस्करीचा अड्डा; देशात पहिल्या क्रमांकावर

न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

श्रीलंकेने पहिला टी-२० सामना सुपरओव्हरमध्ये जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यजमान न्यूझीलंडने बुधवारी येथे पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ९ विकेट व ३२ चेंडू राखून विजय मिळवला आणि १-१ अशी बरोबरी साधली. वेगवान गोलंदाज ॲडम मिल्न याने २६ धावा देत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला.

श्रीलंकेचा डाव १९व्या षटकांत १४१ धावांमध्येच संपुष्टात आला. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने अवघा एक विकेट गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. चाड बोवेस याने ३१ धावांची, टीम सेयफर्ट याने नाबाद ७९ धावांची आणि कर्णधार टॉम लॅथमने नाबाद २० धावांची खेळी साकारत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.