WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 165 खेळाडू होणार सहभागी; 104 भारतीय तर 61 विदेशी खेळाडूंचा आहे समावेश

WPL 2024 Auction
WPL 2024 Auction esakal
Updated on

Women Premier League 2024 Auction : आयपीएलप्रमाणेच महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी देखील डिसेंबर महिन्यात लिलाव होणार आहे. मुंबईत 9 डिसेंबरला होणाऱ्या या लिलावात एकूण 165 महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम हा 2024 च्या फेब्रुवारी - मार्च महिन्यात होणार आहे.

बीसीसीआयने आज एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं. त्यात ते म्हणतात, 'महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 165 खेळाडूंपैकी 104 खेळाडू या भारतीय आहेत तर 61 खेळाडू या विदेशी आहेत. तर 15 खेळाडू या असोसिएट देशांशी सल्लग्नित आहेत. एकूण 56 कॅप्ट तर 109 अनकॅप्ट खेळाडू यंदाच्या लिलावात उतरणार आहेत.'

WPL 2024 Auction
Praggnanandhaa Sister Vaishali : प्रज्ञानंदा अन् वैशालीने रचला इतिहास! ठरले पहिले ग्रँडमास्टर बहीण - भाऊ

यंदाच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात पाच संघांसाठी जास्तीजास्त 30 स्लॉट आहेत. यातील 9 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू डिएन्ड्रा डॉट्टीनला गुजरात जायंट्सने 60 लाखाला खरेदी केले होते. मात्र वादग्रस्तरित्या वैद्यकीय कारणांमुळे तिला वगण्यात आलं.

तिच्या जागी 50 लाख रूपये मोजून ऑस्ट्रेलियाच्या कीम ग्राथला गुजरातने आपल्या संघात घेतलं. मात्र तिला देखील हंगाम संपल्यानंतर तिला गुजरातने रिलीज केलं.

महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरिअर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यासाठी 30 स्लॉट रिकामे आहेत. त्यातील 9 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.

WPL 2024 Auction
Pak vs Aus: गजब बेइज्जती है... ऑस्ट्रेलिया विमानतळावर पाकिस्तानी खेळाडूंना स्वतः ट्रकमध्ये भरावं लागलं सामान अन्...

या पाच संघांनी मिळून एकूण 60 खेळाडू रिटेन केले आहेत. त्यात 21 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. गुजरात जायंट्सच्या पर्समध्ये सर्वाधिक सॅलरी आहे. त्यांना यंदाच्या लिलावात 10 स्लॉट भारायचे आहेत. तर दिल्ली यंदाच्या लिलावात 2.25 कोटी रूपये पर्समध्ये घेऊन सहभागी होणार आहे. त्यांना तीन जागा भरायच्या आहेत.

गतविजेत्या मुंबईच्या पर्समध्ये 2.1 कोटी रूपये आहेत. त्यांना पाच स्लॉट भरायचे आहेत. रॉयल चॅलेंजर बेंगलोर 3.35 कोटी रूपयात सात खेळाडू भरणार आहे. युपी वॉरियर्सला 4 कोटी रूपयात पाच जागा भरायच्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.