Women's Asia Cup INDW vs PAKW : पाकविरूद्ध कॅप्टन हरमनच्या टीम इंडियाचं कसं आहे रेकॉर्ड?

Womens Asia Cup 2022 India vs Pakistan
Womens Asia Cup 2022 India vs PakistanEsakal
Updated on

Women's Asia Cup 2022 India vs Pakistan : महिला आशिया कप 2022 मध्ये गुरूवारी एक मोठा उलफेटर पहावयास मिळाला. तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या थायलँडने पाकिस्तानचा पराभव केला. तीन सामन्यानंतर पाकिस्तानचा हा आशिया कपमधील पहिलाच पराभव होता. आता आज पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबत भिडणार आहे. जरी पाकिस्तानला थायलँडने मात दिली असली तरी भारतीय संघ पाकिस्तानविरूद्धचा सामना हलक्यात घेणार नाही.

Womens Asia Cup 2022 India vs Pakistan
Lionel Messi : मेस्सीने दिले निवृत्तीचे संकेत? म्हणाला 2022 वर्ल्डकप...

भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्या आशिया कपमध्ये दोन सामन्यात जवळपास आठ बदल केले होते. टीम इंडियाने या सामन्यात संघातील प्रमुख खेळाडूंना टप्प्या टप्प्याने विश्रांती देत बेंचवरील खेळाडूंना आजमावून पाहिले होते. मात्र आता पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौर आपला अव्वल संघ मैदानात उतरवेल. भारताने साखळी फेरीतील सलग तीन सामने जिंकले आहे. सध्या भारतीय संघ टॉपवर आहे. भारताची अव्वल सलामी जोडी स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांना गेल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. या दोघी आता पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मैदानात उतरतील.

भारतीय महिला संघाची पाकिस्तानविरूद्धची टी 20 आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाचे पराडे नक्कीच जड आहे. भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 12 वेळा एकमेकांना भिडले आहेत. त्यातील एकूण 10 वेळा भारताने पाकिस्तानला पाणी पाजले आहे. तर दोन सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. शेवटच्या दोन सामन्यांचा विचार केला तर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत.

Womens Asia Cup 2022 India vs Pakistan
Football : भारतीय युवकांचा कुवेतवर विजय

आशिया कपमध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दुखापतीतून सावरलेली मधल्या फळीतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोघी आशिया कपमध्ये सातत्याने धावा करत आहेत. तर गोलंदाजीत दिप्ती शर्मा चांगल्या लयीत आहे ती फलंदाजीतही आपले योगदान देत आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या फलंदाजांना मलेशिया आणि बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात फारशी संधी मिळाली नव्हती. मात्र थायलँडविरूद्धच्या सामन्यात त्यांनी निराशा केली. थायलँडविरूद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानचे मनोबल नक्कीच खालावले असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()