Women's Asia Cup INDW vs SLW : स्मृती मानधनाचे आक्रमक अर्धशतक; भारताने सातव्यांदा जिंकला आशिया कप

Women's Asia Cup T20 2022 India Women vs Sri Lanka Women Final
Women's Asia Cup T20 2022 India Women vs Sri Lanka Women Final esakal
Updated on

Women's Asia Cup T20 2022 India Women vs Sri Lanka Women :

भारताने श्रीलंकेचे 66 धावांचे आव्हान 8 फलंदाज आणि जवळपास 11 षटके राखून पार करत महिला आशिया कपवर सातव्यांदा कब्जा केला. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या 71 धावांमधील 51 धावा एकट्या स्मृती मानधनाने केल्या. भारताकडून रेणुका सिंहने भेदक मारा करत 3 विकेट्स मिळवल्या. श्रीलंका 50 धावा तरी करतोय की नाही अशी अवस्था असताना इनोका रणवीराने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले. तिने श्रीलंकेचा ऑला आऊटही होऊ दिला नाही.

स्मृतीच्या एका षटकारात अर्धशतक आले अन् सामनाही संपला

स्मृती मानधनाने 25 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. भारताने 8.3 षटकात 2 फलंदाजाच्या मोबदल्यात 71 धावा केल्या. स्मृतीने विजयासाठी 1 धावेची गरज असताना षटकार मारत सामना संपवला.

35-2 : भारताला दुसरा धक्का 

कविशा दिलहारीने भारताला दुसरा धक्का दिला. इन फॉर्म जेमिमाह रॉड्रिग्जचा 2 धावेवर उडवला त्रिफळा.

32-1 : लंकेला मिळाले पहिले यश 

झुंजार फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या रणवीराने गोलंदाजीतही चमक दाखवत भारताला पहिला धक्का दिला. तिने 8 चेंडूत 5 धावा करणाऱ्या शेफाली वर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले.

स्मृती मानधनाची आक्रमक सुरूवात

श्रीलंकेचे 66 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मानधनाने भारताला 3 षटकात 25 धावांपर्यंत पोहचवले.

भारतासमोर 66 धावांचे आव्हान

लंकेची शेवटची जोडी इनोका आणि अचिनी यांनी लंकेला कसेबसे अर्धशतक पार करून दिले. विशेष म्हणजे या दोघींना शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत लंकेचा ऑल आऊट होऊ दिला नाही. इनोकाने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले.

43-9 : राजेश्वरी - स्नेह राणाचे लंकेला धक्क्यावर धक्के

राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी लंकेच्या शेपटाला फारशी वळवळ करून दिली नाही.

25-7 : लंका अर्धशतक तरी करणार का?

यानंतर राजेश्वरी गायकवाडने लंकेला अजून खोलात नेले. तिने निलाक्षी डिसेल्वाला 6 धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला. या बरोबरच मलिशा शेहानीला स्नेह राणाने शुन्यावर बाद करत श्रीलंकेची अवस्था 7 बाद 25 धावा अशी केली.

16-5 : श्रीलंकेचा निम्मा संघ गारद 

रेणुका सिंहने चौथ्या षटकातील विकेट्स घेण्याचा धडाका सहाव्या षटकात देखील कायम ठेवला. तिने कविशा दिलहारीचा 1 धावेवर त्रिफळा उडवला.

9-4 : तिसऱ्या षटकात तीन विकेट्स 

श्रीलंकेसाठी रेणुका सिंह टाकत असलेले चौथे षटक एक वाईट स्वप्नासारखे ठरले. या षटकात लंकेने तब्बल तीन विकेट्स गमावल्या. रेणुका सिंहने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षता मादवली 1 धावेवर बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनी 2 धावांची भर घालून धावबाद झाली. रेणुकाने पाचव्या चेंडूवर हसिनी परेराला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था बिनबाद 8 वरून 4 बाद 9 अशी केली.

9-2 : रेणुकाने लंकेला दिला दुसरा धक्का

कर्णधार आटापटूला धावबाद केल्यानंतर रेणुका सिंहने पुढच्याच षटकात हर्षता मादवीला 1 धावेवर बाद केले.

8-1 : श्रीलंकेला पहिला धक्का

रेणुका सिंह आणि रिचा घोष यांनी मिळून श्रीलंकेची सलामीवीर आणि कर्णधार चामरी अटापटूला 6 धावांवर धावबाद केले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.