पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिसमाह मारूफने (Bismah Maroof) आपल्या मुलाला, फातिमाला (Fatima) जन्म दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात कमबॅक केले. तिने बाळंतपणानंतर महिला वर्ल्डकपमधील (ICC Women's World Cup) भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पुनरागनम केले. पहिल्या सामन्यात मारूफला फारशी चमक दावखवता आली नव्हती. मात्र आज महिला दिनी (International Women's Day) तिने दमदार फलंदाजी करत तिच्या मुलीसमोर एक आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या (PAKW vs AUSW) सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर मारूफने बेबी सेलिब्रेशन (Baby Rocking Gesture) केले. सध्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफ ही वनडे महिला वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अर्धशतक ठोकणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटर ठरली आहे. मारूफने 122 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार मारले यामुळे पाकिस्तान बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध 6 बाद 190 धावांपर्यंत मजल मारू शकला. याच्या प्रत्युतरात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने देखील दमदार फलंदाजी करत 32 व्या षटकात 3 बाद 175 धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. ऑस्ट्रेलियाकडून विकेटकिपर आणि सलामीवीर एलिसा हेलीने 72 धावांची आक्रमक खेळी केली.
पाकिस्तानने भारताविरूद्धचा पहिला सामना 107 धावांनी गमावला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानची कर्णधार मारूफची सहा महिन्याची मुलगी फातिमाभोवती एकच घोळका केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग आणि रिचा घोष यांचा समावेश होता. या सर्व जणी फातिमाबरोबर खेळत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.