Women's Junior Asia Cup Hockey : अन्नूची डबल हॅट्ट्रिक; भारताने उझबेकिस्तानविरूद्ध केले तब्बल 22 गोल

Women's Junior Asia Cup Hockey
Women's Junior Asia Cup Hockey esakal
Updated on

Women's Junior Asia Cup Hockey : महिला ज्यूनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने उझबेकिस्तान तब्बल 22 - 0 असा पराभव केला. भारताची अन्नू तब्बल सहा गोलं करत स्टार परफॉर्मर ठरली. तिने (13, 29, 30, 38, 43, 51) व्या मिनिटाला गोल केल्या. वैष्णवी विठ्ठल फाळकेने (3, 56) दोन, मुमताझ खान (6, 44, 47, 60) ने चार, सुनेलिता टोप्पो (17, 17) ने दोन, मुंजू चौरासिया (26) ने एक, दिपीका सोरेंग (18, 25) ने दोन, दीपिकाने (32, 44, 46, 57) ने चार आणि नीलम (47) एक गोल केला.

Women's Junior Asia Cup Hockey
Novak Djokovic French Open : नोव्हाक जोकोविचच्या छातीवर सिक्रेट चिप; यशस्वी कारकिर्दीचं रहस्य केलं उघड

भारताच्या वैष्णवीने तिसऱ्याच मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर मुमताझने भारताची आघाडी वाढवण्यास सुरूवात झाली. त्यात अन्नूनेनही योगदान देण्यास सुरूवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 3 - 0 अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपले वर्चस्व गाजवण्यास सुरूवात केली. हाफ टाईमपर्यंत सुनेलिता, मजू, दीपिका आणि अन्नू यांनी ही आघाडी 10 - 0 अशी नेली. दुसऱ्या हाफमध्ये देखील परिस्थिती तीच राहिली दिपीका अन्नूने आघाडी 13 वर नेली. त्यानंतर मुमताझ आणि दीपिकाने दोन गोल करत तिसऱ्या क्वार्टरपर्यंत 15 - 0 अशी आघाडी घेतली.

Women's Junior Asia Cup Hockey
David Warner Retirement : अखेर वॉर्नरने सांगितलं कधी होणार निवृत्त; 'या' मालिकेनंतर संपवणार कारकीर्द

भारतीय खेळाडू उझबेकिस्तानच्या गोलपोस्टवर एका पाठोपाठ एक गोल करत होते. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने 7 गोलं केले. आता भारत आपला पुढचा सामना 5 जूनला मलेशियाविरूद्ध खेळणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.