WPL 2023 Opening Ceremony : मंदिरा बेदीचा नॉस्टेल्जिया... कियारा अन् परमसुंदरी कृतीच्या ग्लॅमरचा तडका; WPL चा ढासू नारळ फुटला

WPL 2023 Opening Ceremony
WPL 2023 Opening Ceremonyesakal
Updated on

WPL 2023 Opening Ceremony : वुमन्स प्रीमियर लीगच्या ऐतिहासिक अशा पहिल्या हंगमाचा ऐतिहासिक असा उद्घाटन सोहळा झाला. WPL 2023 च्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरूवात ही भारतालील पहिली महिला क्रिकेट प्रेझेंटर म्हणून ओळखली जाणाऱ्या मंदिरा बेदीच्या ओपनिंग कमेंटने झाली.

WPL 2023 Opening Ceremony
WPL 2023 GG vs MI : मुंबई इंडियन्सने गुजरातचा तब्बल 143 धावांनी पराभव करत केली विजयी सुरूवात

Womens Premier League च्या उद्घाटन सोहळ्यात मंदिरा बेदीने सुरूवातीचे सादरीकरण करत महिला प्रीमियर लीगला एक ऐतिहासिक ओळख मिळवून दिली. मंदिरा बेदी ही भारतातील पहिली महिला क्रिकेट प्रेझेंटर आहे. तिनेच क्रिकेटच्या मैदानावर महिला प्रेझेंटरचा ट्रेंड सुरू केला होता. यानंतर आयपीएलचा पहिला हंगाम देखील मंदिरा बेदीने क्रिकेट प्रेझेंटर म्हणून गाजवला होता.

आज भारतीय महिला क्रिकेट विश्वासाठी ऐतिहासिक दिवस होता. महिला क्रिकेट विश्व बदलणारी Womens Premier League आजपासून सुरू होत होती. ही सुरूवात मंदिरा बेदीच्या सादरीकरणाने झाली. यानंतर बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या नृत्याने चाहत्यांचे मनोरंजन केले.

WPL 2023 Opening Ceremony
IND vs AUS 4th Test : इंदूर कसोटी हरल्यानंतर रोहित सेनेने अहमदाबादमधील प्लॅनच बदलला

यानंतर कृती सनॉनने बादल पे पावं हैं या गाण्यावर नृत्यसादरीकरण करत महिला क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास वाढवला. यानंतर एपी ढल्लोनने आपल्या ब्राऊन मुंडे गाण्याने माहोलला चार चांद लावले. त्याच्या पंजाबी गाण्यांनी डी. वाय. पाटील स्टेडियममधील प्रेक्षक डोलू लागले होते.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()