हॅमिल्टन: भारताला न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्डकप (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चांगल्या सुरूवातीनंतर भारताचा डाव कोसळला. अखेर डावखुऱ्या यस्तिका भाटियाने संयमी अर्धशतकी खेळी करत भारताच्या डावाला टेकू दिला. त्यामुळे भारताने 50 षटकात 7 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली.
सलामीवीर स्मृती मानधना (Smirti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shefali Warma) यांनी धडाकेबाज सुरूवात करत 74 धावांची सलामी दिली. नाहिबा अकतेरने स्मृती मानधनाला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली आणि भारताची टॉप ऑर्डर कोसळण्यास सुरूवात झाली. ही कोसळणारी फलंदाजी सावरण्याचा प्रयत्न डावखुऱ्या यस्तिका भाटियाने केला. तिने 80 चेंडूत 50 धावा केल्या.
स्मृती बाद झाल्यानंतर 42 चेंडूत 42 धावांची खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला रितू मोनीने पुढच्याच षटकात बाद केले. त्यानंतर आलेली कर्णधार मिताली राजला (Mithali Raj) रितून खाते देखूल उघडू दिले नाही. ती पुढच्याच चेंडूवर शून्यावर बाद झाली. त्यामुळे अवघ्या 10 चेंडूत बिनबाद 74 धावांवर असलेला भारत 3 बाद 74 धावा अशा अवस्थेत पोहचला. या पडझडीनंतर टीम इंडियाला यस्तिका भाटिया (Yastika Bhatia) आणि हरमनप्रीत कौर यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी संथ फलंदाजी केली. 16 व्या षटकात 3 बाद 74 धावांवर असणाऱ्या भारताला शतक साजरे करण्यासाठी 25 वे षटक उजडावे लागले.
भारत शतकापार गेल्यानंतर हरमनप्रीत कौर आणि भाटिया धावांची गती वाढवतील अशी अपेक्षा होती. मात्र 33 चेंडूत 14 धावा करणारी कौर धावबाद झाली. कौर बाद झाल्यानंतर यस्तिका भाटिया आणि रिचा घोष ढासळणाऱ्या भारतीय फलंदाजीला टेकू देण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.
मात्र अकतेरने रिचा घोषची 26 धावांची खेळी संपवली. यानंतर भाटियाने अर्धशतक पूर्ण केले. तिने भारताला 175 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र अर्धशतकानंतर ती लगेचच माघारी परतली. अखेर स्नेह राणा (27) पूजा वस्त्रकार (30) यांनी भारताला 50 षटकात 7 बाद 229 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.