IND vs PAK : कोण भारी? एकच उत्तर; पाक संघाला नेहमीच आपण पुरुन उरतो

ICC Women's World Cup, India vs Pakistan Record
ICC Women's World Cup, India vs Pakistan RecordSakal
Updated on

ICC Women's World Cup, India vs Pakistan Record : न्यूझीलंडच्या मैदानात 4 मार्चपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ पाकिस्तान महिला संघाविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाप्रमाणेच भारतीय महिला संघाचे पाकिस्तान विरुद्धचे रेकॉर्ड भन्नाट असेच आहे. आतापर्यंत मर्यादित 50 षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत महिला क्रिकेट संघाने एकही सामना गमावलेला नाही.

भारत-पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप रेकॉर्ड (India vs Pakistan in ICC Women's World Cup)

भारतीय महिला संघाने 50 षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यातील विजयासह त्यांनी वर्चस्व राखले आहे. एकंदरीत वनडेचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये 10 वनडे सामने झाले आहेत. यातील सर्व सामने भारतीय महिला संघाने जिंकले आहेत.

ICC Women's World Cup, India vs Pakistan Record
Record @100 : शंभराव्या कसोटीत Century करणारे फलंदाज

टी-20 वर्ल्ड कप रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ 2019 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women's T20 World Cup) पहिल्यांदा समोरासमोर आले. या सामन्यात भारतीय महिला संघाने बाजी मारली होती. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने 6 पैकी चार सामने जिंकले आहेत. 2013 आणि 2016 मध्ये भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

ICC Women's World Cup, India vs Pakistan Record
लेडिज फर्स्ट; पुरुषांच्या आधी महिलांनी खेळलीये वर्ल्ड कप स्पर्धा

वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघ

मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान महिला संघ

बिस्माह मरूफ (कर्णधार), निदा डार (उप कर्णधार), ऐमन अनवर, आलिया रियाज, अनम अमीन, डायना बेग, फातिमा सना, गुलाम फातिमा, जावेरिया खान, मुनीबा अली, नाहिदा खान, नशरा संधू, ओमेमा सोहेल, सिदरा अमीन, सिदरा नवाज (विकेटकीपर), इरम जावेद, नजीहा अल्वी, तुबा हसन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()