Women’s Football World Cup 2023 : जर्मनीवर साखळीतच बाद होण्याची नामुष्की; मोरोक्को संघाचा अंतिम १६ मध्ये प्रवेश

महिलांचा फुटबॉल विश्‍वकरंडक : दक्षिण कोरियाने जर्मनीला ह गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत १-१ अशा बरोबरीत रोखले.
Women’s Football World Cup 2023
Women’s Football World Cup 2023sakal
Updated on

ब्रिस्बेन : माजी विजेत्या जर्मनीच्या महिला फुटबॉल संघावर यंदाच्या विश्‍वकरंडकात साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. दक्षिण कोरियाने जर्मनीला ह गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत १-१ अशा बरोबरीत रोखले.

त्यामुळे जर्मनीला चार गुणांवरच समाधान मानावे लागले. या गटातून कोलंबिया व मोरोक्को या दोन देशांनी अंतिम १६ या बाद फेरीत प्रवेश केला. जर्मनीच्या महिला फुटबॉल संघाने याआधी २००३ व २००७ या दोन वर्षांमध्ये विश्‍वविजेता होण्याचा मान मिळवला होता.

त्यामुळे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या यंदाच्या विश्‍वकरंडकातही त्यांच्याकडे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात होते. जर्मनीने सलामीच्या लढतीत मोरोक्कोचा ६-० असा धुव्वा उडवत धडाकेबाज सुरुवात केली,

पण त्यानंतर कोलंबियाकडून त्यांना २-१ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत जर्मनीला बाद फेरीत पोहोचण्यासाठी विजय आवश्‍यक होता. द. कोरियाकडून त्यांना बरोबरीत रोखण्यात आले.

दक्षिण कोरियाकडून चो सो ह्यून हिने पहिला गोल केला. पूर्वार्धात दक्षिण कोरियाकडून ही आघाडी कायम ठेवण्यात येईल असे वाटत होते, पण ॲलेक्झँड्रा पॉप हिने ४२ व्या मिनिटाला गोल केला आणि जर्मनीसाठी १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही देशांना उत्तरार्धात गोल करता आला नाही. त्यामुळे जर्मनीला या लढतीमधून एका गुणावरच समाधान मानावे लागले.

पहिल्याच प्रयत्नात मोठी झेप

मोरोक्कोचा महिला फुटबॉल संघ पहिल्यांदाच विश्‍वकरंडकात सहभागी झाला होता. सलामीच्या लढतीत त्यांचा जर्मनीकडून ६-० असा धुव्वा उडाला, पण या पराभवामुळे डगमगून न जाता मोरोक्को संघाने झोकात पुनरागमन केले.

मोरोक्को संघाने पुढील लढतीत दक्षिण कोरियाला १-० असे नमवले. तसेच अखेरच्या लढतीत कोलंबियाला १-० असे पराभूत करीत पुढल्या फेरीत प्रवेश केला. मोरोक्कोकडून ॲनिसा लाहमारी हिने ४९ व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करीत ठसा उमटवला.

आता लढत फ्रान्सशी

मोरोक्कोने मोठी झेप घेतली असली तरी आता पुढील फेरीत त्यांच्यासमोर बलाढ्य फ्रान्सचे आव्हान असणार आहे. ही लढत ८ ऑगस्टला ॲडलेड येथे होईल. कोलंबियाला अखेरच्या लढतीत हार पत्करावी लागली असली तरी त्यांनीही बाद फेरीत प्रवेश केला. त्यांचीही लढत ८ ऑगस्टला होणार असून मेलबर्न येथील या लढतीत त्यांना जमैकाचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.