World Archery Championships : भारतीय महिला तीरंदाजी संघाचा बर्लीनमध्ये सुवर्णवेध; जिंकलं पहिलं सुवर्ण

World Archery Championships
World Archery Championshipsesakal
Updated on

World Archery Championships : भारतीय महिला काम्पाऊंड टीमने बर्लीन येथे सुरू असलेल्या जागतिक तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या सुवर्णपदक विजेत्या संघात ज्योती सुरेखा व्हेन्नम, परनीत कौर आणि आदिती गोपीचंद स्वामी या खेळाडूंचा समावेश होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेततील हे भारताचे सर्व प्रकारातील पहिले सुवर्ण पदक आहे.

World Archery Championships
Alex Hales Retirement : भारताचं टी 20 वर्ल्डकप स्वप्न तोडणाऱ्या अ‍ॅलेक्स हेल्सने केली निवृत्तीची घोषणा

सुवर्ण पदकासाठी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंनी मेक्सिकोच्या संघाला 235 - 229 गुणांनी पराभूत केले. मेक्सिकोकडून दाफने क्विंटेरो, आना सोफा हेरनांडेझ जेओन आणि आंद्रेया बेकेर्रा यांचा समावेश होता.

भारताच्या या तीन खेळांच्या संघाने पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावले होते. त्यांनी सेमीफायनलमध्ये गतविजेत्या कोलंबियाचा 220 - 216 गुणांनी विजय मिळवला होता.

World Archery Championships
India Vs Ireland T20I : भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघाची झाली घोषणा

भारतीय संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यानंतर भारतीय महिला काम्पाऊंड संघाने तैवान आणि टर्कीचा पराभव करत सेमी फायनल फेरी गाठली होती. भारताने जागतिक तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी 11 पदक जिंकले होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.