World Boxing Rankings : भारतीय बॉक्सर्सनी रँकिंगमध्ये रचला इतिहास, अमेरिकेला टाकले मागे

World Boxing Rankings
World Boxing Rankingsesakal
Updated on

World Boxing Rankings : भारतीय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय रँकिंमध्ये मोठा इतिहास रचला आहे. भारत रँकिंमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय बॉक्सर्सनी 36 हजार 300 रँकिंग गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांनी अमेरिका आणि क्यूबा सारख्या टॉप बॉक्सिंग नेशन्सला मागे टाकले आहे.

अमेरिका चौथ्या तर क्यूबा हा नवव्या स्थानावर पोहचला आहे. कझाकिस्तान 48 हजार 100 रँकिंग गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे. तर उज्बेकिस्तान 37 हजार 600 गुण घेत दुसऱ्या स्थानावर आहे.

World Boxing Rankings
Pakistan Bomb Blast PSL : बॉम्ब ब्लास्ट झाला अन् बाबर आझम, शाहिद आफ्रिदीची झाली पळापळ

भारताच्या बॉक्सर्ससाठी गेले वर्ष खूप चांगले गेले आहे. भारतीय बॉक्सर सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धात टॉप 5 देशांमध्ये भारतीय संघ राहिला आहे.

गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी 16 पदके जिंकली आहेत. 2008 पासून अव्वल आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताने 140 पदके जिंकले आहेत. तर 2016 पासून भारतीय बॉक्सिंग पुरूष आणि महिला विभागात 16 एलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.

World Boxing Rankings
Ravichandran Ashwin : ऑस्ट्रेलिया विराट, रोहितला नाही तर अश्विनलाच घाबरण्याची 3 कारणे

भारतीय बॉक्सिंग महासंघ (BFI) ने अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन देखील केले आहे. आता 15 ते 26 मार्चदरम्यान भारतात तिसऱ्यांदा महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतात बॉक्सिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. भारताने गेल्या दोन युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर आणि युवा स्तारावर एकूण 22 पदके जिंकली आहेत.

BFI चे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, 'भारत, BFI आणि सर्व क्रीडा प्रेमींसाठी भारताची तिसरी रँकिंग हा एक मैलाचा दगड आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी 44 व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.