सिंगापूर, ता. २५ : भारताचा युवा खेळाडू डी. गुकेश याला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. गतविजेत्या डिंग लिरेन याने गुकेशवर विजय मिळवत महत्त्वाचा एक गुण मिळवला..गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करीत असलेल्या डी. गुकेश याचे पारडे जड समजले जात होते. गुकेशची आव्हानवीरांच्या स्पर्धेतील, तसेच बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील कामगिरीही काबिल ए तारीफच होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. डिंग लिरेन याचा खेळ वर्षभरात ढासळला होता. तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे, असा सूरही उमटू लागला होता. बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्येही लिरेन याने गुकेशविरुद्ध थेट खेळणे टाळले होते. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लढतीआधी गुकेश वरचढ आहे, असे चित्र निर्माण होऊ लागले..डी. गुकेश-डिंग लिरेन यांच्यामधील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीला सोमवारपासून सुरुवात झाली. १४ फेऱ्यांनंतर या लढतीचा जेता मिळणार आहे, मात्र सलामीलाच गुकेशचा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पहिल्या फेरीत गुकेश याने दहावी अनपेक्षित चाल रचली. त्याच्या या चालीमुळे खेळाला गती मिळाली, मात्र लिरेन यानेही आक्रमक खेळ केला. गुकेशची अकरावी चालही चुकली. लिरेनचा राजा मध्यभागी असूनही गुकेशला त्यानंतर काही करता आले नाही. १२व्या, १३व्या चालीनंतर गुकेशची घसरण झाली, तसेच २२व्या, २३व्या चालीनंतर तो पराभूत होईल अशी चिन्ह निर्माण झाली. वझीर टू वझीर असा खेळही त्याच्याकडून झाला नाही. लिरेनने गुकेशचे एकामागोमाग प्यादे मारले. येथेच खेळ संपला. अखेर ४२व्या चालीनंतर गुकेशचा पराभव झाला..रिचर्ड रॅपोर्ट पुन्हा एकदा ट्रेनरडिंग लिरेन याने २०२३मध्ये विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला होता. त्या वेळी लिरेन याने इयान नेपोनियात्ची याला पराभूत केले होते. त्या लढतीत रिचर्ड रॅपोर्ट हा व्यक्ती लिरेन याचा ट्रेनर होता. यंदाही लिरेन याने रॅपोर्ट यालाच ट्रेनर म्हणून निवडले आहे. लिरेन याने या लढतीत फ्रेंच डिफेन्सने ओपनिंग केली..आनंद यांच्या चालीप्रमाणेडी. गुकेश याने पहिल्याच फेरीत आक्रमक चाल रचण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथन आनंद २००१ मध्ये पहिल्यादा विश्वविजेता बनले होते, तेव्हा त्यांनी अशाच प्रकारची चाल खेळून स्पेनच्या ॲलेक्सी शिरोव यांना पराभूत केले होते, मात्र गुकेशसाठी ही चाल क्लेशदायक ठरली. त्यानंतर लिरेन याने या फेरीमध्ये वर्चस्व गाजवले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.