World Cup 2023 Tean India Squad : भारतीय क्रिकेट संघाच्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप संघात बदल अपेक्षित आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आशिया कपदरम्यान जखमी झाला होता. त्याच्याबाबत अद्याप काहीही दुजोरा मिळालेला नाही. निवडकर्त्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात ठेवले होते पण तो शेवटच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त नाही.
यासोबत आर अश्विनला एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरीही केली आहे. तो वर्ल्डकप संघात खेळण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
वर्ल्डकपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी आर अश्विनला अचानक संघात स्थान दिले. 19 महिन्यांनंतर तो एकदिवसीय सामना खेळला. आता त्याने वर्ल्डकप खेळावे की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षर पटेलचा बॅकअप प्लॅन म्हणून अश्विनकडे पाहिल्या जात आहे, पण बोर्डाला अष्टपैलू खेळाडूच्या पुनरागमनाची पूर्ण आशा आहे.
रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण अक्षर तंदुरुस्त होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'संघ व्यवस्थापन अक्षरला दुखापतीतून सावरण्यासाठी पूर्ण संधी देऊ इच्छित आहे. त्याच्या बोटाची दुखापत बरी झाली असून येत्या काही दिवसांत तो वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला आहे आणि त्यामुळे अजून वेळ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.