World Cup 2023 : एकदिवसीय विश्वकरंडकाच्या सध्याच्या गुणतालिकेत यजमान भारत पहिल्या स्थानावर, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा संघ उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करीत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ याने म्हटले की, यजमान भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन देश विश्वकरंडकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही देशांना हरवणे आव्हानात्मक असणार आहे.
स्टीव स्मिथ या वेळी म्हणाला, ‘‘विश्वकरंडकाच्या निर्णायक क्षणी फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहोत. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सर्वोत्तम खेळ गरजेचा असणार आहे. आम्हाला त्यामध्ये यश मिळाल्यास ही आनंदाची बाब असणार आहे.’’
स्टीव स्मिथ म्हणतो... ‘‘ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, पण त्यानंतर आम्ही सलग सामने जिंकत झोकात पुनरागमन केले, पण आणखी काही बाबींमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत.’’
मला व्हर्टिगोचा (चक्कर येणे) त्रास होत आहे, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळेन. बघू या खेळताना कसे वाटते ते...
अफगाणिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य देशांना हरवण्याची किमया या स्पर्धेमध्ये करून दाखवली आहे.
अफगाणिस्तानकडे अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर निष्काळजी खेळ करून चालणार नाही.
वानखेडे स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ धावाच धावा उभारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.