मुंबई : या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन धक्कादायक निकाल लागले. त्यात पराभवाची नामुष्की ओढावलेले गतविजेते इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे उद्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येत आहेत. चुकांपासून बोध घेतल्यानंतर उद्या नव्याने सुरुवात करण्यासाठी दोघांनी कंबर कसली आहे.
दक्षिण आफ्रिकेने सलामीच्या सामन्यात विक्रमी ५ बाद ४२८ धावा उभारल्या होत्या, पण दुबळ्या नेदरलँड्सकडून त्यांना धरमशाला येथील सामन्यात पराभवाचा धक्का बसला. इंग्लंडचीही अशीच अवस्था झाली. नवी दिल्लीतील लढतीत अफगाणिस्तानने त्यांना चितपट केले. प्रत्येकी तीन सामन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात दोन, मात्र इंग्लंडच्या नावावर एकाच विजयाची नोंद आहे.
विश्वकरंडक स्पर्धांत इंग्लंडचे आफ्रिकेवर ४-३ असे वर्चस्व आहे, पण यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघांच्या एकेक पराभवाचा अपवाद वगळता आत्मविश्वासाच्या तुलनेत आफ्रिकेच्या संघाचे एक पाऊल पुढे आहे.
इंग्लंड ताकदवर असला तरी सातत्याचा अभावामुळे ते बेभरवशाचे आहेत; परंतु अनुभवी आणि हुकमी एक्का असलेला बेन स्टोक्स तंदुरुस्त होत असून उद्याच्या सामन्यात खेळण्याच्या शक्यतेमुळे त्यांची ताकद वाढू शकेल. आज स्टोक्सने सराव करून खेळण्याची शक्यता वाढवली.
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरकडे आयपीएलमुळे भारतात खेळण्याचा अनुभव आहे. मुंबई इंडियन्सचा तो सदस्य राहिलेला असल्यामुळे वानखेडे स्टेडियम त्याच्यासाठी होम ग्राऊंडही राहिलेले आहे.
मैदानावरची हिरवळ निघत होती...
या विश्वकरंडक स्पर्धेसाठी इतर स्टेडियमप्रमाणे वानखेडे स्टेडियमचेही नूतनीकरण करण्यात आले. आऊटफिल्ड नव्याने तयार झाले असले तरी आज सीमारेषेजवळ इंग्लंड खेळाडू सराव करता असताना हिरवळ उखडली जात होती, बुटांच्या स्पाईक्समुळे मातीही निघत होती. धरमशाला येथील मैदानाचीही अशीच काहीशी अवस्था होती, त्यावर बटलरने नाराजी व्यक्त केली होती.
शनिवारी ढगाळ वातावरण
मुंबईच्या हवामानात चढ-उतार होत आहेत. काही दिवसांपूर्वी उष्णतेचा पारा चढला होता; परंतु शुक्रवारपासून ढगाळ वातावरण आहे. उद्याही असेच हवामान असणार आहे. त्यामुळे आद्रता अधिक असू शकेल. अधिकचे तापमान ३५ अंशांपर्यंत जाणार असल्यामुळे खेळाडूंचा कस लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.