World Cup 2023: 'या' गोष्टीमुळे भारतात खेळायला मज्जा येते, सेमीफायनलआधी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य

न्यूझीलंडचा वेगान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने आपला भारतातील प्रेक्षकांसमोरचा खेळतानाचा अनुभव सांगितला आहे.
World Cup 2023: 'या' गोष्टीमुळे भारतात खेळायला मज्जा येते, सेमीफायनलआधी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
Updated on

World Cup 2023: सध्या चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेला प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद मजेदार आहे. मला तर नेहमी प्रेक्षकांच्या उत्साहामुळे भारतात खेळायला मज्जा येते, असे मत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने व्यक्त केले.

आमच्या संघाने साखळी स्पर्धेत सुरुवात चांगली केली आणि नंतर जरा खराब कामगिरी झाली, पण योग्य वेळी चांगली कामगिरी करून आता आम्ही परत एकदा मोठ्या स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचलो आहोत. त्यामुळे आता मागचा विचार मनात नाही. आता फक्त बुधवारच्या सामन्याचे विचार आहेत, असे फॉर्ग्युसनने सांगितले. भारताचा संघ चांगल्या लयीत आहे आणि मजबूत आहे, यात काही शंका नाही.

शमी, बुमरा, सिराजचे त्रिकूट जोरदार मारा करत आहेत. आम्हाला भारताला पराभूत करायला आमचा सर्वोत्तमपेक्षा काकणभर सरस खेळ करावा लागेल. तयारी, सराव, योजना सगळे अगदी बरोबर चालू आहे, त्याला थोडी नशिबाची साथ लागणार आहे, असे त्याने सांगितले.

भारतात जेव्हा सामने छोट्या मैदानावर असतात तेव्हा मोठ्या धावाच फलकावर लागतात, याची आम्हाला कल्पना आहे. भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रने केलेली कामगिरी लक्षणीय आहे. आपल्या खेळात सुधारणा व्हावी म्हणून तो भरपूर मेहनत करतो, योग्य विचार करतो, म्हणूनच त्याला हे यश मिळाले आहे. त्याला भारतीय प्रेक्षक ज्या प्रेमाने प्रतिसाद देतात ते बघून मस्त वाटते. आता सगळ्यांना प्रतीक्षा बुधवारची आहे, असे फॉर्ग्युसन म्हणाला. (Latest Marathi News)

World Cup 2023: 'या' गोष्टीमुळे भारतात खेळायला मज्जा येते, सेमीफायनलआधी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
Air Pollution: मुंबईपेक्षाही पुण्याची खराब स्थिती; दोन दिवसांत प्रदूषणात मोठी वाढ, पुण्याची फुप्फुसे भरली अशुद्ध हवेने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.