AUS vs NZ World Cup 2023
AUS vs NZ World Cup 2023 esakal

AUS vs NZ : वॉर्नर - हेडचा 'पॉवर'फुल प्ले! पहिल्या 10 षटकात केला वनडे वर्ल्डकपमधील सर्वात मोठा धमाका

Published on

AUS vs NZ World Cup 2023 : दोन शेजारी देश ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आज धरमशालाच्या सुंदर स्टेडिमवर एकमेकांना भिडले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात करत सामन्यावर पहिल्यापासूनच आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड यांनी 10 षटकात जवळापस 11.80 च्या सरासरीने 118 धावा ठोकल्या. डेव्हिड वॉर्नरने 65 चेंडूत 81 धावा ठोकल्या तर हेडने 67 चेंडूत 109 धावा चोपत ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान वनडे शतक ठोकले. या दोघांनी 175 धावांची धडाकेबाज सलामी दिली.

AUS vs NZ World Cup 2023
AUS vs NZ : हेडचे वर्ल्डकप पदार्पण दणक्यात साजरं, दोन महिन्यानं बॅट घेतली हातात अन् केला मोठा विक्रम

हेड आणि वॉर्नर यांनी 10 षटकात 118 धावा केल्या. या वर्ल्डकप इतिहासातील पॉवर प्लेमध्ये झालेल्या सर्वाधिक धावा ठरल्या. या दोघांनी न्यूझीलंडविरूद्ध खेळून त्यांचेच आठ वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडले. विशेष म्हणजे हेडचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिलाच सामना आहे.

या डावखुऱ्या आक्रमक फलंदाजाला सप्टेंबर महिन्यात दुखापत झाली होती. त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. मात्र हेडने आपल्या पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात कूल धरमशालेचे वातावरण चांगलेच तापवले.

विशेष म्हणजे या 118 धावात वॉर्नरचा 65 तर हेडचा 50 धावांचा वाटा होता. मात्र वॉर्नरने 37 चेंडूत 65 धावा केल्या होत्या. तर हेडने 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. स्ट्राईक रेटच्या बाबतीत वॉर्नरपेक्षा हेड आघाडीवर होता.

AUS vs NZ World Cup 2023
Asian Para Games : चीनमधील पॅरा गेम्समध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! खेळाडूंंनी ठोकलं पदकांचं शतक

वर्ल्डकप सामन्यात पहिल्या पाच षटकानंतर झालेल्या सर्वाधिक धावा

  • 71/0 - न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ऑकलंड 2015 सेमी फायनल

  • 67/0 - न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड, वेलिंग्टन 2015

  • 60/0 - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड, धमरशाला, 2023

  • 54/1 - कॅनडा विरूद्ध ऑस्ट्रेलिया, बंगळुरू, 2011

वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या 10 षटकात झालेल्या सर्वाधिक धावा

  • 133/0 - श्रीलंका विरूद्ध इंग्लंड, लीड्स, 2006

  • 119/1 - वेस्ट इंडीज विरूग्ध कॅनडा, सेंच्युरियन, 2003 वर्ल्डकप

  • 118/0 - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड, धमरशाला, 2023 वर्ल्डकप

  • 118/0 - न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका, ख्रिस्टचर्च, 2015

  • 116/2 - न्यूझीलंंड विरूद्ध इंग्लडं, वेलिंग्टन, 2015 वर्ल्डकप

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()