World Cup 2023 Eden Gardens : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या आयोजनावरून बीसीसीआयवर आधीच टीका होत आहे. त्यात आता इडन गार्डन स्टेडियमची बाहेरची भिंत कोसळल्याने बीसीसीआयच्या डोकेदुखीत वाढच झाली आहे. कोलकात्यात यंदाच्या वर्ल्डकपमधील पाच सामने होणार आहे.
भिंत कोसळण्याची घटना ही पहिल्या सामन्यापूर्वी दोन दिवस आधी घडली. अर्थ मुव्हिंग मशिन भिंतीवर पडल्यामुळे ही घटना घडली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने सांगितले की पुनर्वसनाचे काम सुरू असताना ही घटना घडली. पडलेली भिंत दुरूस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
इडन गार्डनवर शनिवारी नेदरलँड्स विरूद्ध बांगलादेश सामना होणार आहे. तर मंगळवारी इडन गार्डनवर पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. 5 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्वाचा सामना इडन गार्डनवरच होणार आहे. तर 11 नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. याचबरोबर 16 नोव्हेंबरला वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामना खेळवण्यात येणार आहे.
ही पडलेली भिंत स्टेडियमच्या गेट नंबर 3 ते 4 दरम्यानच्या एका लाईट टॉवरजवळची आहे. इडन गार्डन स्टेडियम हे 1864 साली बांधण्यात आलं आहे.
इडन गार्डन हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. भारतातील हे सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम असून त्याची आसन क्षमता ही 66,000 इतकी आहे.
आयपीएलचा संघ केकेआरचे हे होम ग्राऊंड असून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडे या स्टेडियमची मालकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.