World Cup 2023 Eng vs Ban : गतविजेत्यांना विजयी पुनरागमनाचे वेध; इंग्लंड अन् बांगलादेशमध्ये आज रंगणार लढत

World Cup 2023 England vs Bangladesh
World Cup 2023 England vs Bangladesh
Updated on

World Cup 2023 England vs Bangladesh : गतविजेता इंग्लंडचा क्रिकेट संघ यंदाच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात सलामीलाच न्यूझीलंडकडून पराभूत झाला. आता या धक्क्यामधून बाहेर येत जॉस बटलरच्या इंग्लंड संघाला विजयी पुनरागमनाचे वेध लागले आहेत. इंग्लंड संघासमोर उद्या (ता. १०) बांगलादेशचे आव्हान असणार आहे. बांगलादेशने सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानला पराभूत करीत महत्त्वाचे दोन गुण मिळवले आहेत. आता सलग दुसऱ्या विजयासाठी बांगलादेशचा संघ प्रयत्न करील.

इंग्लंडच्या संघाला सलामीच्या लढतीत हार सहन करावी लागली असली तरी एकदिवसीय व टी-२० हे दोन विश्‍वकरंडक सलग पटकावणारा संघ म्हणून त्यांना ओळखले जात आहे. याच कारणामुळे बांगलादेशचा संघ त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही.

World Cup 2023 England vs Bangladesh
CWC Points Table : सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर, टीम इंडिया टॉप 4 मधून बाहेर

जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, ज्यो रुट, जॉस बटलर यांच्या खांद्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची मदार आहे. हॅरी ब्रुक या युवा फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने नेटमध्ये कसून सरावही केला आहे. प्रत्यक्षात मैदानात त्याचा अवलंब व्हायला हवा.

शाकीब उल हसन व मेहिदी हसन मिराज या फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशच्या अफगाणिस्तानवरील विजयात मोलाची भूमिका बजावली. पुन्हा त्यांच्यावर भिस्त असणार आहे. तसेच लिटन दास, नजमुल शांतो, शाकीब उल हसन, मुशफिकर रहीम, महमुद्दूलाह यांना इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावावे लागेल.

World Cup 2023 England vs Bangladesh
Nagpur Sport : रितिक, तेजस्विनी अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेते

नव्या खेळपट्टीवर सामना

बांगलादेश-अफगाणिस्तान यांच्यामध्ये धरमशाला येथे विश्‍वकरंडकाचा सामना रंगला. या लढतीसाठीची खेळपट्टी संथ होती. त्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. आता इंग्लंड-बांगलादेश यांच्यामधील लढत नव्या खेळपट्टीवर पार पडणार आहे. या लढतीसाठीही खेळपट्टी संथ असल्यास इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी मोकळीक मिळणार नाही. बांगलादेशच्या संघात उजवे, डावखुरे वेगवान गोलंदाज असून अव्वल दर्जाच्या फिरकी गोलंदाजांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.