Ind vs Afg : पाकविरुद्ध सामन्याआधी भारतीयांना चुका सुधारण्याची संधी, प्लेइंग-11 मध्ये किती होणार बदल?

World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11
World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11sakal
Updated on

World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11 : एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीला ऑस्ट्रेलियाला हरवताना सर्व काही भारताच्या बाजूने घडले होते; मात्र सुरुवातीच्या फलंदाजांचे अनपेक्षित अपयश चिंता वाढवणारे ठरले होते. कमकुवत पडलेल्या या बाजूमध्ये सुधारणा करण्याची संधी आज अफगाणिस्थानविरुद्धच्या सामन्यातून मिळणार आहे. तसेच पाकविरुद्धच्या लढतीसाठी तयारीही आजच्या सामन्यातून करता येणार आहे.

भारतीय संघाची एकूणच ताकद पाहता अफगाणिस्तानविरुद्धचा आजचा सामना कठीण जाणार नाही असे चित्र आहे. त्यातच अफगाणला बांगलादेशकडून सलामीच्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर झालेला आहे.

World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11
World Cup 2023:पाकिस्तानची श्रीलंकेवर ६ गडी राखून मात, मोहम्मद रिझवान ठरला विजयाचा हिरो

पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत रोखून भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली होती, परंतु रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाल्याने मोठे संकट उभे राहिले होते. त्यात ईशान आणि श्रेयस यांनी बेजबाबदार फटके मारून विकेट बहाल केल्या होत्या. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडून कानउघाडणी झाल्यानंतर आता त्यांच्या विचारात किती बदल झालाय हे आज दिसून येईल.

दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४२८ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती; तर श्रीलंकेने ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. यावरून ही खेळपट्टी फलंदाजीस पूर्णतः पोषक आहे हे सिद्ध झाले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीयांकडून अशाच आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे. या संधीचा फायदा रोहित, ईशान आणि श्रेयस अय्यर कसा घेतात हे महत्त्वाचे आहे. गुणतक्त्यात दोन गुण झालेले सर्व संघ सरासरीत भारतापेक्षा पुढे आहेत, त्यामुळे सरासरीही वाढवण्यासाठी संधी आहे.

World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11
ICC World Cup: इंग्लंडचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, शतक झळकवणारा डेविड मलान ठरला सामनावीर

तसे बघायला गेले तर अफगाणिस्तानच्या संघाने क्रिकेट जगतात केलेली प्रगती लक्षणीय आहे. अफगाण खेळाडूंमध्ये जिद्द आहे आणि संधीचे सोने करायची नियत आहे. तरीही जी चमक अफगाणिस्तानचा संघ टी-२० सामन्यात दाखवतो, तसा कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यात दाखवू शकलेला नाही.

चालू विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वांत छोट्या सीमारेषा असलेले मैदान आहे दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम. याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ४०० पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडून दाखवला आहे. भारतीय फलंदाजांना त्याचीच पुनरावृत्ती करायचे ध्येय मनात असणार. हे सत्य आहे, की अफगाणिस्तानची गोलंदाजी चांगली आहे. फझल फारुखी आणि नवीन उल हक नवा चेंडू चांगला टाकतात. फिरकीत मुजीब उर रहमान आणि राशिद खान दर्जेदार मारा करू शकतात. प्रश्न अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा आहे. तसेच १० षटके टिच्चून मारा करायची गुणवत्ता फार कमी गोलंदाजांमध्ये आहे. याचाच फायदा घेत भारतीय संघ बुधवारी चांगले क्रिकेट खेळून मोठा विजय मिळवायचा प्रयत्न करेल.

World Cup 2023 Ind vs Afg Team India Playing-11
Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल, 'हा' खेळाडू होणार बाहेर?

कोणत्याही संघाला कमी लेखणार नाही, असे भारतीय संघातून सांगितले जात आहे. पहिल्या सामन्यातील विजयाने हाती आलेली चांगल्या खेळाची लय सोडणार नाही. भारतीय संघातील मोजक्या खेळाडूंनी मंगळवारी संध्याकाळी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सराव केला. रोहित शर्मा आणि ईशान किशनसोबत फलंदाजीचा सराव करताना दिसले. दिसायला मैदानाची खेळपट्टी बारीक हिरव्या झाकेची असली, तरी इथे फलंदाजांना चांगली फटकेबाजी करता येणार हे स्पष्ट आहे. छोट्या सीमारेषांमुळे मारलेल्या फटक्यांना धावांचे बक्षीसही मिळणार हे फलंदाज जाणून आहेत.

तिकिटांसाठी राजकारण्यांची भाऊगर्दी

दिल्लीत भारताचा एकमेव सामना होणार असल्याने आठवड्याचा कामाचा वार असूनही तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद लाभला आहे. दिल्ली राजकारणी आणि सनदी अधिकाऱ्‍यांचा केंद्रबिंदू असल्याने ऐनवेळी तिकिटांच्या मागणीला जोर आल्याने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()