World Cup 2023: भारत-श्रीलंका सामन्यात ब्लॅकमध्ये तिकीट व्रिकी; 4 हजाराचं तिकीट 20 हजारांना

World Cup 2023
World Cup 2023
Updated on

मुंबई- भारत विरुद्ध श्रीलंका विश्वकप सामना वानखेडे मैदानावर सुरु आहे. यावेळी क्रिकेटच्या मैदानाबाहेर ब्लॅकमध्ये तिकीट विर्की सुरु असल्याचं समोर आलं आहे. उत्सुक प्रेक्षकांना चढ्या दराने तिकीट ब्लॅकमध्ये विकले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १५०० चे तिकीट ८ हजार रुपयांना आणि ४ हजारचे तिकीट २० हजार रुपयांना विकले जात आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका सामना वाडखेडे मैदानावर खेळला जात असल्याने अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने तिकीट खरेदी केली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातूनच तिकीट विक्री केली जाते. पण, वानखेडे स्टेडियमबाहेर काहीजण ब्लॅकमध्ये तिकीट विक्री करत असल्याचं समोर आलंय. अव्वाच्या सव्वा भावाने तिकीट विक्री सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. (World Cup 2023 India Sri Lanka Match Tickets in Black 4 thousand ticket for 20 thousand)

अनेकदा ऑनलाईन तिकीटची विक्री तात्काळ संपते. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमूस होतो. अशावेळी अनेकजण मैदानाच्या बाहेर येऊन काही जुगाड होतो का? हे पाहात असतात. अशाच क्रिकेटप्रेमींना गाठून काही दलाल त्यांना तिकीट देण्याचं आमिष दाखवतात. यावेळी त्यांच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी केली जाते. क्रिकेट प्रेमापायी अनेकजण जास्त दराचे तिकीट खरेदी देखील करतात.

World Cup 2023
Ratan Tata: क्रिकेट खेळाडूंना दंड, बक्षिसाबाबत रतन टाटांचं स्पष्टीकरण; म्हणाले, मी ICCला...
World Cup 2023
World Cup 2023

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यानही अशाच प्रकारे ब्लॅकमध्ये तिकीट विक्री झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली होती. त्यांच्याकडून जवळपास ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमबाहेर हा प्रकार घडला होता. भारताच्या सामन्यादरम्यानच हे दलाल सक्रिय होत असल्याचं दिसून येतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.