Sachin Tendulkar:माझ्या मित्रा तुझा सल्ला ऐकला अन्... सचिननं शोएबच्या त्या ट्विटला दिला करारा जवाब!

भारताने विजय मिळवल्यावर सचिनने ट्वीट करत शोएब अख्तरला चांगलाच टोमणा दिला.
Sachin Tendulkar:माझ्या मित्रा तुझा सल्ला ऐकला अन्... सचिननं शोएबच्या त्या ट्विटला दिला करारा जवाब!
Updated on

Sachin Mocked Shoaib AKhtar:विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारताची विजयी घौडदौड सुरुच आहे. नुकताच भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये खेळवला गेलेला सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. पाकिस्तान संघावर पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढावली. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ एकूण ८ वेळा आमनेसामने आले, ज्यात पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आला नाही.

अशातच, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या दिग्गजांमध्ये ट्वीटच्या माध्यमातून टोमणेबाजी करण्यात आली आहे. शोएब अख्तरने सामना सुरु होण्यापूर्वी विजय मिळवण्यासाठी सल्ला दिला होता, ज्यात त्याने सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला होता. भारताने विजय मिळवल्यावर सचिनने ट्वीट करत शोएब अख्तरला चांगलाच टोमणा दिला.

तर झालं असं की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु होण्याआधी शोएब अख्तरने ट्वीट करत पाकिस्तान संघाला विजयाचा मूलमंत्र दिला होता. यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे सांगितलं की, सचिनला आऊट करताना जसं मी डोकं शांत ठेवलं होतं, तसच तुम्हीही डोक शांत ठेऊन खेळा.मात्र, सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. यावर सचिनने अख्तरला टोमणा दिला. सचिन ट्वीट करत म्हणाला की, "माझ्या मित्रा, तुझा सल्ला ऐकला आणि सर्व शांतपणे केलं."

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १९१ धावांचं आव्हान दिलं. जे भारताने ७ गडी राखून मोडून काढलं. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची महत्वाची खेळी केली. ज्यामुळे भाऱताला सहज विजय मिळाला. (Latest Marathi News)

Sachin Tendulkar:माझ्या मित्रा तुझा सल्ला ऐकला अन्... सचिननं शोएबच्या त्या ट्विटला दिला करारा जवाब!
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा मोडला व्ह्यूअरशीपचा विक्रम! 3.5 कोटी प्रेक्षकांनी पाहिला OTT वर सामना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.