श्रीलंकेने उभा केलेला धावांचा मोठा डोंगर पाकने तेवढ्याच जोरदार प्रतिकाराने पार केला आणि विश्वकरंडक स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात चार शतके झालेला हा सामना वर्ल्डकपमधला ऐतिहासिक ठरला.
या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुसल मेंडिसने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले. कुसल मेंडिसने 77 चेंडूत 122 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. मात्र या धमाकेदार शतकानंतर कुसल मेंडिसला रुग्णालयात दाखल करावे लागले. याच कारणामुळे तो मैदानावर नाही.
खरं तर, कुसल मेंडिसला पायाला क्रॅम्प आला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात जावे लागले. कुसल मेंडिसच्या अनुपस्थितीत दुशान हेमंथा मैदानात खेळण्यासाठी आला. तर सदीरा समरविक्रमाने यष्टिरक्षकाची भूमिका साकारली.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या कुसल मेंडिसला पायाला क्रॅम्प आल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर कुसल मेंडिसच्या जागी दुशान हेमंथा मैदानावर आहे.
कुशल मेंडीस (१२२) आणि सदीरा समरविक्रमा (१०८) यांनी केलेल्या शतकांमुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३४४ एवढी भलीमोठी धावसंख्या उभारली; पण पाकिस्तानने ती १० चेंडू राखून पार केली. भरवशाचा बाबर आझम अपयशी ठरला, तरी अब्दुल्ला शफिक (११३) आणि मोहम्मद रिझवान (नाबाद १३१) यांनी केलेल्या शतकामुळे पाकला हा विजय साध्य झाला.
दोन बाद ३७ अशा अवस्थेनंतर पाकने हा सामना जिंकला. या सामन्यात एकूण १४ फलंदाजांच्या मोबदल्यात ६८९ धावांचा खच पडला. पाकने सलामीचा सामना सहज जिंकला होता; मात्र आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे श्रीलंकेसाठीही सामना महत्त्वाचा होता. पहिल्याच षटकात कुशल परेरा शून्यावर बाद झालेला असताना श्रीलंकेने दडपण झुगारून प्रतिहल्ला केला, त्यामुळे पाकचे सर्वच गोलंदाज बॅकफूटवर गेले. हसन अलीने चार विकेट मिळवले, परंतु त्यातील दोन विकेट डावाच्या ५० व्या षटकात त्याला मिळाल्या.
श्रीलंकेच्या या प्रतिहल्ल्याचा शिल्पकार होता तो कुशल मेंडीस. त्याने ७७ चेंडूत धडाकेबाज १२२ धावांची खेळी साकार केली. तो मैदानावर होता तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या षटकामागे साडेसात अशी होती. कुशलने डावाच्या २५ व्या षटकापर्यंत ७९ धावा केल्या होत्या, परंतु या षटकात त्याने पाकचा हुकमी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सलग तीन चौकार मारत थेट ९२ पर्यंत मजल मारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.