World Cup 2023 Semi-Final : पाऊस येणार पाकिस्तानच्या मदतीला? बंगळूरमधील हवामानामुळे न्यूझीलंडमधील देव पाण्यात

World Cup 2023 Semi-Final
World Cup 2023 Semi-Final sakal
Updated on

World Cup 2023 Semi-Final : पाकिस्तान किक्रेटसाठी वर्ल्ड कप 2023 आंबट गोड राहिला आहे. सुरूवातीच्या पराभवानंतर पाकिस्तानने आता उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाला आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आहेत. पाकिस्तानचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडचेही 8 सामन्यांत 8 गुण आहेत, मात्र नेट रनरेटमुळे किवी संघ पाकिस्तानच्या पुढे चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडला 9 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. तर पाकिस्तानचा संघ 11 नोव्हेंबरला इंग्लंडशी भिडणार आहे. दरम्यान, बंगळुरूमधून पाकिस्तानसाठी चांगली तर न्यूझीलंडसाठी वाईट बातमी येत आहे.

World Cup 2023 Semi-Final
World Cup 2023 : भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी! लाजिरवाण्या कामगिरीनंतर संपूर्ण क्रिकेट बोर्डची हकालपट्टी

AccuWeather नुसार, 9 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये 74 टक्के पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास श्रीलंका आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक गुण मिळेल. याआधी याच मैदानावर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण झाला नव्हता. पण दोन्ही डावात 20 षटके खेळली गेली होती. त्यामुळे पाकिस्तान संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना 21 धावांनी जिंकला. किवी संघासाठी हा मोठा धक्का होता, कारण या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 401 धावा केल्या होत्या.

world cup 2023 pakistan can reach semi final new zealand vs sri lanka can be canceled due to rain
world cup 2023 pakistan can reach semi final new zealand vs sri lanka can be canceled due to rain
World Cup 2023 Semi-Final
Women's Asian Champions Trophy 2023 : चक दे इंडिया! भारतीय महिला संघाने जपानला ४-० ने हरवून जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

जर न्यूझीलंडचा सामना पावसामुळे रद्द झाला तर, त्याचे 9 सामन्यांतून केवळ 9 गुण होतील. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघाने इंग्लंडला पराभूत केल्यास त्याचे 10 गुण होतील. आणि किवी संघापेक्षा पाकिस्तान 1 गुणांसह पुढे जाईल.

अफगाणिस्तानचेही 7 सामन्यांत 8 गुण आहेत. पण त्याचे उर्वरित 2 सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहेत. अशा स्थितीत अफगाण संघाची उपांत्य फेरीची वाट अवघड झाली आहे. जर आपण वर्ल्ड कप 2023 बद्दल बोललो तर अफगाणिस्तानने आतापर्यंत इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे.

World Cup 2023 Semi-Final
Gautam Gambhir : सचिन, धोनीनंतर आता 'गौतम गंभीर' वर ही येणार बायोपिक, दिसणार हा अभिनेता?

पाकिस्तानचा संघ शेवटचा 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला होता. 2015 आणि 2019 मध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. अशा स्थितीत बाबर आझम अँड कंपनीला गेल्या दोन मोसमातील खराब कामगिरी मागे टाकून उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.