CWC Points Table : सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर, टीम इंडिया टॉप 4 मधून बाहेर

world cup 2023 points table after New Zealand beats Netherlands
world cup 2023 points table after New Zealand beats Netherlandssakal
Updated on

World Cup 2023 Points Table : भारतात खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत सर्व संघांनी प्रत्येकी किमान एक सामना खेळला आहे. तर नेदरलँड आणि न्यूझीलंडचे संघ प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. न्यूझीलंड संघाने आपले दोन्ही सामने जिंकले असून संघाचा नेट रन रेटही इतर संघांपेक्षा सरस आहे. अशा स्थितीत किवी संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. नेदरलँड्सपूर्वी न्यूझीलंडने सलामीच्या लढतीत इंग्लंडचा पराभव केला होता.

world cup 2023 points table after New Zealand beats Netherlands
IND vs Pak : नरेंद्र मोदी स्टेडियमला छावणीचे स्वरूप; भारत-पाकिस्तान लढतीसाठी ११ हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात

त्याच वेळी, जर आपण टॉप 4 संघांबद्दल बोललो तर त्यात भारताचे नाव नाही. न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे, ज्याने अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय नोंदवला होता.

भारतीय क्रिकेट संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला नक्कीच पराभूत केले, परंतु सामना कमी स्कोअरिंगचा होता आणि संघ उशिरा जिंकला त्यामुळे नेट रन रेट चांगला राहिला शकत नाही.

world cup 2023 points table after New Zealand beats Netherlands
Zainab Abbas:हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी

या हंगामात आतापर्यंत केवळ अव्वल 5 संघांनी किमान एक सामना जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँड संघाने दोन सामने गमावले आहेत. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया सहाव्या, तर अफगाणिस्तान सातव्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंका नवव्या आणि इंग्लंडचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()