World Cup 2023 Points Table : भारत-पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाने बाबरच्या संघाला दिला मोठा धक्का!

World Cup 2023 Points Table ind vs pak
World Cup 2023 Points Table ind vs pakSAKAL
Updated on

World Cup 2023 Points Table : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बुधवारी वर्ल्डकप 2023 मध्ये अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर वर्ल्डकपच्या गुणतालिकेत अनेक बदल पाहिला मिळाले आहेत. भारत चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

तर भारत-पाकिस्तान सामना होण्याआधी टीम इंडियाने बाबरच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. गुणतालिकेत भारताने पाकिस्तानला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. भारत आणि पाकिस्तानचे सध्या प्रत्येकी चार गुण आहेत पण रोहित ब्रिगेडचा नेट रनरेट चांगला आहे.

अफगाणिस्तानपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

World Cup 2023 Points Table ind vs pak
World Cup 2023:वंदे मातरम..! २०११ च्या विश्वचषकात घडलेली घटना पुन्हा घडली, स्टेडियममध्ये अंधार झाला अन्...

पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. दक्षिण आफ्रिके एक स्थान घसरून चौथ्या क्रमांकावर गेला आहे. त्याचे 2 गुण आहेत. इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तिघांनीही आतापर्यंत प्रत्येकी एक विजय मिळवला आहे.

श्रीलंका आठव्या, नेदरलँड नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. तिन्ही संघांना त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे गुणतालिकेत खाते अद्याप उघडलेले नाही. भारताविरुद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानला एका स्थानाचा फटका बसला.

World Cup 2023 Points Table ind vs pak
Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात अश्विनचा ​​पत्ता कट? कर्णधार रोहित 'या' खेळाडूला देणार संधी

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माची जादू पाहायला मिळाली. 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावांची शानदार खेळी केली. रोहित आणि इशान किशन (47) यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भक्कम भागीदारी केली. भारताने 35 षटकात 2 गडी गमावून सहज धावांचा पाठलाग केला. विराट कोहली 55 आणि श्रेयस अय्यर 25 धावांवर नाबाद राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.