IND vs PAK WC 2023 Schedule : अखेर भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली; तब्बल 9 सामन्यांमध्ये बदल

IND vs PAK WC 2023 Schedule
IND vs PAK WC 2023 Schedule esakal
Updated on

IND vs PAK WC 2023 Schedule : बीसीसीआयने अखेर वनडे वर्ल्डकप 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलली असून आता 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबरोबरच 8 सामन्यांच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे.

IND vs PAK WC 2023 Schedule
Sanju Samson : तुला नंतर लक्षात येईल त्यामुळे... संजूला माजी क्रिकेटपटूने दिला मोलाचा सल्ला

वेळापत्रकात बदल झालेले सामने

इंग्लंड - बांगलादेश, 10 ऑक्टोबर

पाकिस्तान - श्रीलंका 10 ऑक्टोबर

ऑस्ट्रेलिाय - दक्षिण आफ्रिका 12 ऑक्टोबर

न्यूझीलंड - बांगलादेश 13 ऑक्टोबर

भारत - पाकिस्तान 14 ऑक्टोबर

इंग्लंड - अफगाणिस्तान 15 ऑक्टोबर

ऑस्ट्रेलिया - बांगलादेश, 11 नोव्हेंबर

इंग्लंड - पाकिस्तान 11 नोव्हेंबर

भारत - नेदरलँड 12 नोव्हेंबर

IND vs PAK WC 2023 Schedule
BCCI Donations : सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला खासदारांच्या फिटनेसची चिंता; दिले कोट्यावधींचे डोनेशन

बीसीसीआय आणि आयसीसीने अखेर आज (दि. 9) वनडे वर्ल्डकप 2023 चे बदललेले वेळापत्रक जाहीर केले. सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. मात्र हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हा वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना हा घटस्ठापनेच्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती. ही विनंती बीसीसीआयने मान्य केली.

मात्र या सामन्याच्या तारखेत बदल करताना आणखी चार सामन्यांच्या तारखा बदलाव्या लागणार होत्या. त्यातच कोलकाता पोलिसांनी देखील 12 नोव्हेंबरच्या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास नकार दिला होता. याचदरम्यान कोलकातामध्ये काली पूजा असते त्यामुळे याही सामन्याची तारीख बदलावी लागली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.