World Cup 2023 schedule : स्पष्ट शब्दात नकार! गुजरातनंतर आता कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयचं टेन्शन वाढवलं

World Cup 2023 schedule
World Cup 2023 schedule esakal
Updated on

World Cup 2023 schedule : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 च्या वेळापत्रकाचा गोंधळ अजून संपलेला नाही. आयसीसी आणि बीसीसीआयने गेल्या महिन्यातच वर्ल्डकपचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र सुरक्षा एजन्सींनी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अहमदाबादमध्ये भारत - पाकिस्तान सामना खेळवण्याबाबत आक्षेप घेतला. यानंतर बीसीसीआयने आपल्या वेळा पत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला. (Pakistan Vs England)

वर्ल्डकपचे नवे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच आता कोलकाता पोलिसांनी देखील ऐनवेळी पाकिस्तानच्या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा 12 नोव्हेंबर रोजी इडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याला दिवळी सेलिब्रेशनमुळे सुरक्षा देऊ शकत नसल्याचे सांगत सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

World Cup 2023 schedule
वर्ल्ड कपपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूची होणार एंट्री?, कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य

कोलकातामध्ये 12 नोव्हेंबरला काली पूजा सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. त्याच दिवशी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे कोलकाता पोलिसांवर वर्ल्डकप सामन्यासाठी सुरक्षा पुरवण्याचा अतिरिक्त ताण येणार आहे.

वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल होणारच आहे. नवरात्रीमुळे 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणारच आहे. आता पाकिस्तान आणि इंग्लंड याचे देखील वेळापत्रक बदलण्यात येण्याची शक्यता आहे.

जर असं झालं तर वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या तिसऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदललं जाईल. पाकिस्तानचा श्रीलंकेविरूद्धचा 12 ऑक्टोबरला होणारा सामना 10 ऑक्टोबरला होणार आहे.

World Cup 2023 schedule
Shreyas Hareesh Death : होत्याचं नव्हतं झालं! अवघ्या १३ वर्षांच्या तरुण मुलाचा बाईक रेसिंगमध्ये अपघातात दुर्देवी मृत्यु

गेल्या वर्ल्डकपपेक्षा यंदाच्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यास आधीच उशीर झाला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने एका वर्षापूर्वीच वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र बीसीसीआयने फक्त 3 महिने शिल्लक असताना वेळापत्रकाची घोषणा केली होती. आता त्यात पुन्हा बदल होणार आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()