World Cup 2023 : भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी! लाजिरवाण्या कामगिरीनंतर संपूर्ण क्रिकेट बोर्डची हकालपट्टी

World Cup 2023 Sri Lanka Cricket Board
World Cup 2023 Sri Lanka Cricket Boardsakal
Updated on

World Cup 2023 Sri Lanka Cricket Board : वर्ल्ड कप 2023 मध्ये खराब कामगिरी करणाऱ्या श्रीलंका किक्रेट बोर्डमध्ये मोठा भुकंप झाला आहे. श्रीलंका सरकारने संपूर्ण क्रिकेट बोर्डाची हकालपट्टी केली आहे.

श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. श्रीलंकेने आतापर्यंत वर्ल्ड मध्ये खेळलेल्या 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. आणि संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.

गेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यासंदर्भात क्रीडा मंत्रालयानेही निवडकर्त्यांना प्रश्नोत्तरे विचारली होती.

World Cup 2023 Sri Lanka Cricket Board
Team India : संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार? आफ्रिकेविरुद्ध विजयानंतर कर्णधार रोहित स्पष्टच बोला

श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे. आणि एक अंतरिम समिती स्थापन केली आहे, ज्याचे नेतृत्व कर्णधार अर्जुन रणतुंगा करेल, ज्याने श्रीलंकेला 1996 मध्ये विश्वविजेते बनवले होते.

अध्यक्ष अर्जुन रणतुंगा व्यतिरिक्त, अंतरिम समितीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेल्या आणखी 5 लोकांचा समावेश केला आहे. ही अंतरिम समिती श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी स्थापन केली असून, ही समिती सध्या श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाचे काम पाहणार आहे.

World Cup 2023 Sri Lanka Cricket Board
KL Rahul : 'जेव्हा मी तुटतो, तेव्हा तू...' भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर उपकर्णधारची 'ती' पोस्ट व्हायरल

श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अचानक निलंबनाचे मुख्य कारण म्हणजे भारतात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमधील संघाची खराब कामगिरी. आयसीसीच्या या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. या संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले असून, त्यात केवळ 2 सामने जिंकले आहेत. म्हणजे त्याने 5 सामने गमावले आहेत. एवढेच नाही तर त्याचा नेट रन रेटही मायनसमध्ये आहे. त्यामुळे जवळपास ते वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनही बाहेर पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.