World Cup 2023 Rahul Dravid : फायनलमध्ये पराभवानंतर कोच द्रविडने सांगितले टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमचे दृश्य

Team India breaks down in dressing room Rahul Dravid
Team India breaks down in dressing room Rahul Dravid
Updated on

Team India breaks down in dressing room Rahul Dravid : खुप मेहनत घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय खेळाडू खूपच निराश झाले आहेत.

ट्रॉफी न जिंकल्याचं दु:ख टीम इंडियाच्या खेळाडूंवर स्पष्ट दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज मैदानात रडायला लागले, तर विराट कोहली कॅपने चेहरा लपवत मैदानाबाहेर गेला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तेथील दृश्य पाहण्यासारखे नव्हते. सर्वांचे चेहरे पडलेले होते. खेळाडू खूप नाराज झाले. आता काय करावे हे त्याला समजत नव्हते.

Team India breaks down in dressing room Rahul Dravid
Ind vs Aus : 'नरेंद्र मोदी नाही... या स्टेडियमवर फायनल खेळवा...' पराभवानंतर अहमदाबादमधील पब्लिकवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव करून विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेते होण्याचा मान मिळविला. सामना संपल्यानंतर राहुल द्रविडने प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्मा अनेक खेळाडूच्या डोळ्यात पाणी होते. ड्रेसिंग रूममधलं ते वातावरण मला असह्य होतं. एक प्रशिक्षक म्हणून हे पाहणे कठीण होते, कारण मला माहित आहे की या मुलांनी किती मेहनत घेतली आहे, त्यांनी काय योगदान दिले आहे. आम्ही कोणते क्रिकेट खेळलो हे तुम्ही पाहिले आहे. पण हो हा खेळाचा भाग आहे. असे घडत असते, असे घडू शकते.

भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावली तर रोहित शर्माचे अर्धशतक 3 धावांनी हुकले. ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि मार्नस लॅबुशेनचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.