WC23 Team India Squad : सूर्यकुमारपेक्षा भारी आकडेवारी, तरीही संघातून वगळलं, संजू सॅमसनवर अन्याय?

World Cup 2023 Team India Squad
World Cup 2023 Team India Squad
Updated on

World Cup 2023 Team India Squad : बीसीसीआयने भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंमध्ये यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा समावेश आहे.

सॅमसनच्या जागी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित आणि नाराज झाले. त्यांची नाराजगी चुकीची म्हणता येणार नाही कारण आकडेवारी तरी असेच म्हणते.

World Cup 2023 Team India Squad
World Cup 2023: KL राहुल की इशान किशनमध्ये कोणाला मिळणार संधी? अजित आगरकर स्पष्टच बोलले

संजू सॅमसनबद्दल सांगायचे तर, त्याने आपल्या करिअरमध्ये 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात संजूने 55.71 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. संजूने तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. या वर्षातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर संजूला फारशा संधी मिळाल्या नाहीत. तो फक्त दोन एकदिवसीय सामने खेळला. त्याने वेस्ट इंडिजसाठी पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 धावा आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावा केल्या.

World Cup 2023 Team India Squad
India ODI World Cup Squad 2023: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'या' 15 खेळाडूंचे स्थान निश्चित, हे तीन दिग्गज बाहेर?

सूर्यकुमार जरी टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक असला, तरी वनडेमध्ये त्याचा फॉर्म काही खास नाही. सूर्यकुमारने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत 26 सामने खेळले असून त्यात त्याने 24.33 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. या वर्षी खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 35 धावा आहे. तो तीनदा गोल्डन डक बनला.

World Cup 2023 Team India Squad
World Cup 2023: युझवेंद्र चहलला न घेणं टीम इंडियाचा सेफ झोन? सोशल मीडियावर चर्चा

आकडेवारीच्या बाबतीत संजू सॅमसन पुढे दिसत आहे. त्याचा सरासरी सूर्यकुमारपेक्षा दुप्पट आहे. त्याच वेळी टीम इंडिया त्याच्यावर अधिक विश्वास ठेवू शकते. हे देखील त्याच्या खेळीवरून दिसून येते. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीनंतर त्याचे चाहते बीसीसीआयला सतत ट्रोल करत आहेत. बीसीसीआयने संजूवर अन्याय केला असल्याचे ते म्हणत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.