World Cup 2023 Tickets : अवघ्या 15 मिनिटांत खेळ संपला... रोहित -विराट नाही तरी चाहत्यांच्या तिकीटावर उड्या

World Cup 2023 Tickets
World Cup 2023 Ticketsesakal
Updated on

World Cup 2023 Tickets : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची तिकीट विक्री सुरू झाली आहे. सध्या नॉन इंडिया सामन्यांची तिकीट विक्री सुरू आहे. मात्र या तिकीटावरही चाहत्यांच्या प्रचंड उड्या पडत आहेत. मुंबईच्या वानखेडे आणि बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील सर्व नॉन इंडिया सामन्यांची तिकीट विकली गेली आहे.

बीसीसीआय आणि आयसीसीने नॉन इंडिया सामन्यांची तिकीट विक्री सुरू केली होती. भारताच्या सामन्यांच्या तिकीटविक्रीनेळी तुफान प्रतिसाद मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नॉन इंडिया सामन्यांवेळीच क्रिकेट चाहत्यांनी तिकीटांवर उड्या घेतल्या. अवघ्या 15 मिनिटात सर्व तिकीटे विकली गेली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

World Cup 2023 Tickets
World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी दुखापतींमुळे वाढली संघाची डोकेदुखी! कर्णधारसह 4 प्रमुख खेळाडू दौऱ्यातून बाहेर

भारताच्या सामन्याची तिकीट विक्री अजून सुरू झालेली नाही. याचा अर्थ या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार नाहीत तरी क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियमच्या तिकीट काऊंटवर हाऊसफुलचा बोर्ड लावला.

बीसीसीआयने वेळापत्रकाचा गोंधळ घातल्यामुळे वर्ल्डकपची तिकीट विक्री ही उशिरा सुरू झाली आहे. बीसीसीआयने तिकीट विक्री करताना काही स्तर ठरवले आहेत. यातील मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील भारताव्यतिरिक्तच्या 7 सामन्यांची सर्व तिकीटं विकली गेली आहे. कोलकात्यातील देखील तीन पैकी दोन सामन्यांची सर्व तिकीटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली आहेत.

बीसीसीआयमधील सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, 'वानखेडेवरील भारताव्यतिरिक्तच्या तीन सामन्यांची सर्व तिकीटं अवघ्या 15 मिनिटात विकली गेली आहेत. 21 ऑक्टोबर इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरूद्ध बांगलादेश आणि 7 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान या तीन सामन्यांची सर्व तिकीटे विकली गेली आहेत.'

World Cup 2023 Tickets
Neeraj Chopra : फेंको तो ऐसा फेकों की... सेहवागने नीरजचे कौतुक करताना कोणाला मारला टोमणा?

भारत हा 2016 नंतर पहिल्यांदाच मोठी स्पर्धा आयोजित करत आहे. भारताव्यतिरिक्तच्या सामन्यांसाठीची तिकीट विक्री ही 25 ऑगस्टपासून सुरू झाली होती. ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील धरमशाळा येथील सामन्याची तिकीटे देखील हाऊसफुल झाली आहेत.

पाकिस्तानचा संघ 7 वर्षानंतर भारतात खेळण्यासाठी येणार आहे. त्यांचेही चार सामने सोल्ड आऊट झाले आहे. असाच प्रतिसाद भारत आणि पाकिस्तान सामन्याला देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.