World Cup 2023 Virat Kohli Rohit Sharma : भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 8 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताने आतापर्यंतच्या आपल्या वर्ल्डकप प्रवासात सांघिक खेळाचे उत्तम प्रदर्शन घडवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील सर्वच फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. प्रत्येक खेळाडू हे वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघाच्या गरजेकडे जास्त लक्ष देत आहेत.
मात्र सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे या रोहित शर्माचे चाहते जाम भडकले आहेत. रोहित शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये निस्वार्थी भावनेने क्रिकेट खेळल्याचे क्रिकेट जाणकार सांगत असतानाच आता स्टार स्पोर्ट्सने आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे सोशलवरचं वातावरण चांगलंच तापलं आहे. #SHAMEONSTARSPORTS हा ट्रेंड चांगलाच वाढू लागला आहे.
एका नेटकऱ्याने या व्हिडिओत रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडू, ज्यांनी यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आहे त्यांना व्हिडिओमध्ये फार कमी स्थान दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
हा एक्स (ट्विटर) युजर लिहितो की, 'आम्ही हा ट्रेंड का सुरू केला? याची पार्श्वभूमी अशी की संघात अजून 10 खेळाडू आहेत. तरी देखील स्टार स्पोर्ट्सने एका खेळाडूलाच सारखं सारखं दाखवलं.'
'रोहित शर्मा, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंच्या कामगिरीनंतर त्यांना म्हणावी तशी प्रसिद्ध मिळाली नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.