विषयच हार्ड! भारतानं पाकला लोळवताच कोल्हापूर, इचलकरंजीत एकच जल्लोष; तिरंगा, भगवा झेंडा घेऊन तरुणाई उतरली रस्त्यावर

पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये अहमदाबाद येथे सामना झाला.
World Cup Cricket Tournament India vs Pakistan Kolhapur
World Cup Cricket Tournament India vs Pakistan Kolhapuresakal
Updated on
Summary

भारताचा एकतर्फी विजय झाल्यानंतर मलाबादे चौकात दिवाळीच साजरी होताना दिसली.

कोल्हापूर : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर (World Cup Cricket Tournament) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तरुणांनी एकच जल्लोष केला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये अहमदाबाद येथे सामना झाला. एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड सुरू ठेवली.

World Cup Cricket Tournament India vs Pakistan Kolhapur
'हा वर्ल्डकप ICC चा नाही तर...' पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम डायरेक्टरचा सुटला संयम! BCCI वर केलं गंभीर आरोप

विजयाची चाहूल लागताच अनेक तरुणांनी आपला मोर्चा चौकाकडे वळवला. विजय जवळ येईल तसे राष्ट्रध्वज व भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. पार्टी स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. चौकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब होताच एकच जल्लोष, आतषबाजी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. 

World Cup Cricket Tournament India vs Pakistan Kolhapur
IND vs PAK CWC 2023 : रोहितची हिटिंग अन् अय्यरची साथ, भारतानं आठव्यांदा पाकला लोळवलं

इचलकरंजीत मलाबादे चौकात जल्लोष

इचलकरंजी : भारताचा एकतर्फी विजय झाल्यानंतर मलाबादे चौकात दिवाळीच साजरी होताना दिसली. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी गजबजलेल्या गर्दीत जल्लोषाची गर्दी झाल्याने मुख्य मार्ग फुलून गेला होता. एखादी मोटारसायकल रॅली निघावी त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांवर दुचाकीचालक गाड्यांना झेंडे लावून विजयाचा जल्लोष करत होते. पाकविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यावर शहरातील मलाबादे चौकात जल्लोष ही इचलकरंजीची परंपरा ठरली आहे. याप्रमाणे परिसरात जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण, नागरिकांची गर्दी जमली.

World Cup Cricket Tournament India vs Pakistan Kolhapur
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()