Virat Kohli: विश्वचषकात विराट कोहलीचा भीमपराक्रम! रिझवान काय रोहितलाही टाकलं मागं

India Vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने विश्वचषकात मैलाचा दगड पार केलाय.
Virat Kohli: विश्वचषकात विराट कोहलीचा भीमपराक्रम! रिझवान काय रोहितलाही टाकलं मागं
Updated on

Virat Kohli Top Scorer: सध्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रविवारी (दि.२२ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला.

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने सामन्यात झुंजार खेळी करत, भारताला विजयापर्यंत नेलं. या डावात त्याने ९५ धावांची खेळी केली. त्याला शतक साजरं करण्यात अपयश आलं, पण विश्वचषकाच्या या स्पर्धेत त्याने मैलाचा दगड पार केलाय. विराट यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

विराटने विश्वचषक स्पर्धेत एकूण ५ सामने खेळले. खेळलेल्या ५ सामन्यात त्याने ११८च्या सरासरीने ३५४ धावा केल्या आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध ९५ धावांची खेळी करत, त्याने तिसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर उडी मारली. त्याने मागच्या सामन्यात भारताला विजयापर्यंत पोहोचवत शतक झळकावलं होतं.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे पाडत, त्याने अव्वलस्थान पटकावलं. तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा विराजमान झाला आहे. रोहितने या स्पर्धेत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये ३११ धावा केल्या आहेत. म्हणजेच, सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर भारतीयांनी कब्जा केला आहे. (Latest Marathi News)

Virat Kohli: विश्वचषकात विराट कोहलीचा भीमपराक्रम! रिझवान काय रोहितलाही टाकलं मागं
IND vs NZ : न्यूझीलंडचा पेपर गेला अवघड; विराट अन् शामीच्या ग्रेस गुणांमुळं टीम इंडिया काठावर पास!

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २७३ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या या डावात राचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी चांगली फलंदाजी करत, न्यूझीलंडला चांगली धावसंख्या उभारण्यात मदत केली. डॅरेच मिचेलनं झंझावती शतक झळकावलं, तर राचिन रवींद्र याने त्याला ७५ धावा करत सुरेख साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने षटकारांचा वर्षाव केला. त्यानंतर विराटने संयमी खेली करत भारताचा विजय सहज करुन दिला.(Latest Marathi News)

Virat Kohli: विश्वचषकात विराट कोहलीचा भीमपराक्रम! रिझवान काय रोहितलाही टाकलं मागं
World Cup: बदला पूर्ण ! न्यूझीलंडची दांडी गूल करत भारताने काबिज केलं 'अव्वल स्थान'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.