India Vs Pakistan : वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यात एकच ढाण्या वाघ! एक, दोन नाही तब्बल तीन मॅन ऑफ द मॅच

India Vs Pakistan Sachin Tendulkar
India Vs Pakistan Sachin Tendulkar esakal
Updated on

India Vs Pakistan : 5 ऑक्टोबरपासून भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप सुरू झाला आहे. पहिलाच सामना हा गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात झाला. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकाच सामन्याची सर्वात जास्त क्रेज आहे. तो म्हणजे 14 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याची!

भारत - पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असल्याने या सामन्याला एक विशेष महत्व आहे. तसंही भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध आतापर्यंत आपले शत प्रतिशत विजयी रेकॉर्ड अबाधित राखले आहे. आतापर्यंतच्या झालेल्या 7 वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळच चारली आहे.

India Vs Pakistan Sachin Tendulkar
Quinton de Kock : निवृत्तीच्या घोषणेनंतर डिकॉकचा डबल धमाका; चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी कसली कंबर

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये देखील भारताचे पारडे जड आहे. जर वनडे वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक नाव सातत्याने आपल्या समोर येते. ते म्हणजे सचिन तेंडुलकर!

वर्ल्डकपचा सामना... त्यात समोर पाकिस्तान असेल तर मास्टर ब्लास्टर हा आपल्या बाह्या सरसावूनच खेळतो. त्याने वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 313 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये झालेल्या 7 भारत - पाकिस्तान सामन्यातील तीन सामन्यात सचिन तेंडुलकरच सामनावीर आहे.

वर्ल्डकपमधील भारत - पाक सामन्यातील सामनावीर

सचिन तेंडुलकर - 3

नवज्योत सिंग सिद्धू - 1

व्यंकटेश प्रसाद - 1

विराट कोहली - 1

रोहित शर्मा - 1

India Vs Pakistan Sachin Tendulkar
India Vs Pakistan : BCCI अँटी नॅशनल... तरूणींचे नृत्य अन् फुलांचा वर्षाव; अहमदाबादमधील 'त्या' व्हिडिओवर वादंग

सचिननंतर नवज्योत सिंग सिंद्धू, व्यंकटेश प्रसाद, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 1 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक धावा करण्यामध्ये सचिन तेंडुलकर नंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 193 धावा केल्या आहेत. त्यानंतर सईद अन्वरने 185 तर रोहित शर्माने 155 धावा केल्या आहेत. मिसबाह उल हकने 132 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.