World Cup Qualifier: झिम्बाब्वेनं जिंकलं! 'वन डे'त दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धाव फरकानं जिंकला सामना

भारताचं रेकॉर्ड तोडण्यापासून झिम्बाब्वेचा संघ केवळ काही धावांपासून दूर राहिला.
CWC23_Zimbabwe
CWC23_Zimbabwe
Updated on

Cricket World Cup Qualifier: झिम्बाब्वेच्या संघानं क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडमध्ये दमदार कामगिरी करत दुसरं सर्वाधिक धाव फरकानं जिंकण्याचं रेकॉर्ड केलं आहे. अमेरिकेच्या संघाविरुद्धच्या सामन्यात झिम्बावेनं ५० षटकात तब्बल ४०८ धावा ठोकल्या. या सामन्यात अमेरिकेला ३०४ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. (World Cup Qualifier Zimbabwe rout USA to record second biggest win by runs in ODIs)

CWC23_Zimbabwe
Team India : शिखर धवनला पुन्हा बनवणार टीम इंडियाचा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

वनडे क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचं स्थान अढळं आहे. भारतानं याच वर्षी थिरुवअनंतरपुरम इथं श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त कामगिरी करत त्यांना ३१७ धावांनी पराभूत केलं होतं.

CWC23_Zimbabwe
Team India: कसोटीनंतर आता 'या' दिग्गज खेळाडूची ODI कारकीर्दही संपली! निवडकर्त्यांच्या अ‍ॅक्शनने खळबळ

झिम्बाब्वेचं देशवासियांना गिफ्ट

आपल्याच होमग्राऊंडवर झिम्बाब्वेनं देशवासियांना खास गिफ्ट दिलं आहे. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी शानदार फलंदाजीचं दर्शन यावेळी घडवलं. यामध्ये ५० षटकात झिम्बाब्वेच्या संघानं ६ बळी देत ४०८ धावांचा डोंगर उभारला होता. एवढी डोंगराऐवढी धावसंख्या उभारण्यात सीन विल्यम्सचा वाटा मोठा असून त्यानं आपल्या बॅटनं १०१ चेंडूंमध्ये १७४ धावा खेचल्या.

तर दुसरीकडं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी देखील दमदार मारा करत अमेरिकन संघाच्या फलंदाजांचं कंबरड मोडलं. त्यामुळं ४०८ धावांचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ १०४ धावांवरच आटोपला. वर्ल्डकपच्या क्वालिफायर राऊंडमध्ये झिम्बाब्वेच्या सलग चौथ्या विजयामुळं अ गटातील त्यांचं स्थान पक्कं झालं आहे.

CWC23_Zimbabwe
Dhoni च्या 'त्या' एका फोटोमुळं ३ तासांत ३० लाख लोकांनी डाऊनलोड केले Candy Crush

असा झाला खेळ?

यष्टिरक्षक जॉयलॉर्ड गुम्बी यानं क्रमवारीच्या शीर्षस्थानी मैदानावर टिकून राहतं ७८ धावांची खेळी केली पण झिम्बाब्वेचा कर्णधार क्रीझवर आल्यावर झिम्बाब्वेनं वेगवान खेळ केला. विल्यम्सनं यात मुख्य भूमिका बजावली. विल्यम्सनं २१ चौकार आणि ५ षटकार खेचले आणि शेवटच्या षटकात सिकंदर रझानं २७ चेंडूत ४८ धावा केल्या आणि रायन बर्लने १६ चेंडूत ४७ धावा केल्या.

रिचर्ड नगारावा आणि रझा या दोघांनी दोन विकेट घेतल्यामुळं अमेरिकेच्या फक्त तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली तर तीन धावा बाद झाल्यानं अमेरिकेकडून निराशाजनक कामगिरी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.