‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ पुतिन यांचा अपमानावर अपमान

Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarSakal
Updated on

Russia-Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा क्रीडा जगतावर परिणाम दिसून येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातून आणखी एक धक्का बसलाय. युक्रेनवर विनाशकारी विपरित बुद्धीनं आक्रमण कऱणाऱ्या पुतिन यांना आंतरराष्ट्रीय तायकांदो फेडरेशनकडून मानद स्वरुपात मिळालेला ब्लॅक बेल्ट काढून घेण्यात आलाय. याआधी आंतरराष्ट्रीय जूडो फेडरेशननं त्यांना अध्यक्षपदासह अम्बेसिडर पदावरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. (World Taekwondo strips Vladimir Putin of black belt over Ukraine invasion)

वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात रस असलेल्या पुतिन यांचे जूडो कराटेशी अनोख नात आहे. वयाच्या अकराव्या वर्षांपासूनच ते या खेळात पारंगत आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय तायकांदो फेडरशेनकडून पुतिन यांना मानद ब्लॅक बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले होते. रशियाने युक्रेन विरुद्ध छेडलेल्या युद्धाच्या निषेधार्थ तायकांदो फेडरेशननं पुतिन यांची मानद उपाधी काढून घेतलीये.

Russia-Ukraine War
स्मृती-दीप्तीची फिफ्टी; मितालीला गिफ्ट देण्याचा दिसला इरादा

आंतरराष्ट्री तायकांदो फेडरेशनने एका ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. याशिवाय रशियामध्ये तायकांदोची कोणतीही स्पर्धा होणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या कोणत्याही खेळाडूला रशियाचा ध्वजाखाली खेळता येणार नाही. याचा अर्ध तायकांदोच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रशियाचे राष्ट्रगीत वाजणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()