WTC Final 2027 : रोहित शर्माच्या मागणीला केराची टोपली; इंग्लंडमध्ये सलग चौथ्यांदा होणार WTC Final?

WTC Final
WTC Final
Updated on

WTC Final 2027 Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 ची फायनल देखील इंग्लंडमध्येच होणार आहे. ही फायनल 2027 च्या जून महिन्यात होणार आहे. सलग चौथी WTC Final ही इंग्लंडमध्ये होणार आहे. यापूर्वी 2021 ची WTC फायनल ही साऊथहॅम्पटनमध्ये, 2023 ची फायनल ही ओव्हलवर तर 2025 ची फायनल ही लॉर्ड्सवर होणार आहे.

शुक्रवारी आयसीसीने 2024 - 2027 च्या काळासाठी सोशल रिसपॉन्सिबिलिटी प्रोव्हायडर संदर्भात रिक्वेस्ट फॉर प्रपोजल प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये आयसीसी कोणत्या देशात कोणत्या स्पर्धा आयोजित करणार आहे. याचा उल्लेख करण्यात आला आहे.

WTC Final
Shoaib Malik Match Fixing : शोएब मलिकचा BPL चा करार मॅच फिक्सिंगमुळं झाला रद्द..? पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो...

भारत सलग दोनवेळा WTC फायनलमध्ये पोहचला आहे. मात्र भारताच्या पदरी सलग दोनवेळा अपयशच आले. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने WTC ची फायनल ही इंग्लंडच्या बाहेर आयोजित करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली होती. तसेच ही फायनल जून महिन्यातच घेण्याची गरज नाही असंही तो म्हणाला होता.

रोहित म्हणाला होता की, 'WTC फायनल ही आयपीएलच्या फायनलनंतरच का असते? ही फायनल मार्चमध्ये का होऊ शकत नाही? फक्त जून महिन्यातच आपण फायनल खेळू शकतो असं नाही. ही फायनल वर्षात कधीही खेळली जाऊ शकते. तसेच जगाच्या कोणत्याही भागात खेळली जाऊ शकते. फक्त इंग्लंडमध्येच नाही तर ती कुठेही खेळवली जाऊ शकते.'

WTC Final
IND vs ENG : भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांचा घेतला समाचार; तिसऱ्याच दिवशी निकाल लावणार?

गेल्या WTC फायनलमध्ये भारताला इंग्लंडच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी फार कमी कालावधी मिळाला होता. ते आयपीएलनंतर थेट WTC फायनल खेळण्यासाठी गेले होते. आयसीसीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं की वर्षाच्या इतर महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या देशाची टी 20 लीग सुरू असते. त्यामुळे जून सोडून दुसऱ्या महिन्यात फायनल घेणे खूप अवघड आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.