WTC INDvsNZ : तिसऱ्या दिवसाअखेर किवी एक पाऊल पुढेच!

INDvsNZ
INDvsNZTwitter

ICC World Test Championship Final : मेगा फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ भारताच्या एक पाऊल पुढेच आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव उरकून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाने दिवसाअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ 116 धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवर टॉम लॅथम आणि डेवोन कॉन्वे या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली असताना अश्विनने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने टॉम लॅथमला विराट करवी झेलबाद केले. लॅथमने 104 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर डेवोन कॉन्वेच्या रुपात ईशांतने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. बाद होण्यापूर्वी कॉन्वेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिले-वहिले अर्धशतक आपल्या नावे नोंदवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 12(37)* आणि रॉस टेलर 0(2) नाबाद परतले. आतापर्यंतच्या खेळाचा विचार केल्यास न्यूझीलंडचा संघ सामन्यात टीम इंडियाच्या तुलनेत एक पाऊल पुढेच आहे.

तत्पूर्वी जेमिन्सनचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने भारताचा पहिला डाव अवघ्या 217 धावांत आटोपला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 44 (124) आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे 29(79) या दोघांनी 3 बाद 146 धावांवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. संघाच्या आणि आपल्या खात्यात एकाही धावेची भर न घालता जेमिन्सनने विराट कोहलीला माघारी धाडले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंतलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. त्याची विकेटही जेमिन्सन यानेच घेतली. अजिंक्य रहाणे 49 (117) धावा करुन परतल्यानंतर तळाच्या फलंदाजांना मैदानात अधिक काळ तग धरता आला नाही. रविंद्र जडेजा 15 (53) आणि अश्विन 22 (27) या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून जेमिन्सनने सर्वाधिक 5 बळी टिपले. तर वॅगनार-बोल्ट दोन आणि साउदीला एक विकेट मिळाली.

तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंड 2 बाद 101 धावा

101-2 : ईशांतच्या गोलंदाजीवर अर्धशतकीवर फसला, मोहम्मद शमीने घेतला कॉन्वेचा झेल. त्याने 154 चेंडूचा सामना करत 54 धावांची उपयुक्त खेळी केली

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या फायनलमधील पहिले अर्धशतक डेवोन कॉन्वेच्या नावे

70-1 : अश्विनने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का, टॉम लॅथम 30 धावा करुन माघारी, विराट कोहलीने घेतला कॅच

न्यूझीलंडच्या सलामी जोडीनं संयमी खेळ दाखवत पूर्ण केली अर्धशतकीय भागीदारी

चहापानापर्यंत न्यूझीलंडच्या संघाने कोणतीही विकेट न गमावता धावफलकावर 36 धावा लावल्या

न्यूझीलंडच्या सलामीची जोडी संयमी फलंदाजी करताना दिसत आहे. पहिल्या 20 षटकात या जोडीने 36 धावा केल्या. लेथम 17 (64) आणि कॉन्वे 18 (56) धावांवर खेळत होते.

लॅथम-ड्वेन कॉन्वेन केली न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात

न्यूझीलंड गोलंदाज

कायले जेमिन्सन सर्वाधिक 5 विकेट्-

ट्रेंट बोल्ट 2 विकेट

नील वॅगनर 2 विकेट

टीम साउदी 1 विकेट

217-10 : बोल्टने जडेजाची विकेट घेत भारतीय संघाचा पहिला डाव केला खल्लास

213-9 : जेमिन्सनने बुमराहला खातेही उघडू दिले नाही

213-8 :जेमिन्सनचा दणका; ईशांतला 4 धावांवर धाडले माघारी

205-7 : टीम इंडियाला आणखी एक धक्का, रविचंद्रन अश्विन 27 चेंडूत 22 धावा करुन तंबूत साउदीला मिळाले यश

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीवर टीम इंडियाची मदार होती. पण तिसऱ्या दिवशी दोघेही स्वस्तात माघारी परतले.

-अर्धशतकाच्या उंबरठ्यावर अंजिक्य झाला बाद

भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या रुपात टीम इंडियाला सहावा धक्का बसला, त्याने 117 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 49 धावा केल्या. वॅगनरच्या गोलंदाजीवर लॅथमने घेतला झेल

-टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत

विराट कोहली पाठोपाठ जेमिसन याने पंतला स्वस्तात धाडले माघारी, 19 चेंडूचा सामना केल्यानंतर चौकाराने खाते उघडल्यानंतर पंत झेलबाद होऊन माघारी परतला

टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली 44 धावांवर बाद, जेमिसनच्या गोलंदाजीवर विराट झाला बाद. भारताचा चार बाद 149 धावा.

-तिसऱ्या दिवशी कसे असतील सत्र...

पहिलं सत्रं - 3:30 pm - 5:30 pm

दुसरं सुत्र - 2 - 6:10 pm - 8:25 pm

तिसरे सत्र - - 8:45 pm - 11:00 pm

साउदम्टनमध्ये ढगाळ वातावारण, वेगवान गोलंदाजांना मिळणार मदत

  • हवामान विभागाच्या अंदाजानुसार साउदम्टनमध्ये रविवारी तुरळक पावसाची शक्यता आहे. सकाळी सुर्यप्रकाश असेल मात्र दुपारनंतर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.